Advertisement

‘मरे’वर शनिवारी नाईट ब्लॉक, तर रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक


‘मरे’वर शनिवारी नाईट ब्लॉक, तर रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 च्या दरम्यान पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी म्हणजेच 23 सप्टेंबरला रात्री स्पेशल ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्यरात्री ००.३० ते सकाळी ६.२० या वेळेत मुलुंड ते कळवा दरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे.

शिवाय, रात्री ००.०१ ते सकाळी ६.१० या वेळेत अप धिम्या मार्गावरील वाहतुक दिवा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे.  ब्लॉक दरम्यान कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर अप आणि डाउन धिम्या लोकल थांबणार नाहीत.

ब्लॉक दरम्यान डाउन मार्गावरील सीएसएमटी-ठाणे रात्री ००.३४ वा, स.६.३२ वा सीएसएमटी-डोंबिवली, स.६.४८ वा. सीएसएमटी-ठाणे, स. ७.१६ वा. सीएसएमटी- डोंबिवली लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत.

याशिवाय, सीएसएमटी-कल्याण रात्री १०.२४ वा, सीएसएमटी-ठाणे रात्री ११.३९ वा, सीएसएमटी-ठाणे रात्री ११.५९ वाजताची लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच धावणार आहे. कुर्ला- अंबरनाथ लोकल कुर्ला ते मुंब्रा दरम्यान, ठाणे-आसनगाव लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धावणार नाही. पहाटे ५.२८ वाजता सीएसएमटीहून टिटवाळासाठी सुटणारी लोकल तर, सीएसएमटीहून सकाळी ६.१२ ची लोकल मुंब्रा स्थानकातून चालवण्यात येणार आहे.

अप मार्गावरील कल्याण-सीएसएमटी रात्री ९.२० वा लोकल (१ फेरी) कल्याण-ठाणे रात्री ११.३९, रा.११.५८ वा, ठाणे-सीएसएमटी पहाटे ४, ४.२०, ४.४०, ५.०८, ५.३०, ५.४०, ५.४६ आणि ६.१६ ची लोकल (८ फेऱ्या) तर डोंबिवली-सीएसएमटी सकाळी ८.१४, ८.४१ वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत.  तसंच, ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक अप आणि डाउन जलद मार्गावरुन चालवण्यात येणार असल्यामुळे अप-डाउन मार्गावरील सर्व मेल-एक्सप्रेस गाड्या १० ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.


रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाइन आणि हार्बर मार्गावर रविवारी म्हणजे २४ सप्टेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.


मध्य रेल्वेवरील ब्लॉक

मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यानची डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. त्यामुळे डाउन धिम्या मार्गावरील लोकल गाड्या कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. परिणामी, या स्थानकांवरील प्रवासी कल्याण, डोंबिवली आणि दिवा स्थानकातून प्रवास करू शकतात.

सीएसएमटीहून सकाळी १०.२० ते दुपारी २.४२ या वेळेत डाऊन जलद मार्गावरून सुटणाऱ्या सर्व लोकल गाड्यांना आणि अप जलद मार्गावरील लोकल गाड्यांना सकाळी ११ ते दुपारी ३.०८ या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे त्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच सीएसएमटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.


हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल गाड्यांची वाहतूक सकाळी ११.०१ ते दुपारी ४.२६ वाजेपर्यंत नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान बंद राहणार आहे. तसेच, ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल गाड्यादेखील सकाळी ११.०४ ते दुपारी ४.०४ वाजेपर्यंत पनवेल ते नेरूळदरम्यान बंद राहणार आहेत. पनवेल-अंधेरी लोकलची वाहतूकदेखील बंद असणार आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते नेरूळ आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते नेरूळदरम्यान स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहेत.


पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. तसेच रविवारी उपनगरीय मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान बोरीवली ट्रेन प्लॅटफॉर्म १, २ आणि ४ वर तर विरार लोकल प्लॅटफार्म ३ आणि ५ वर बोरीवली स्थानकात थांबणार आहेत. बोरीवली स्थानकात मेल-एक्सप्रेस गाड्या प्लॅटफॉर्म ८, ९ आणि ५ वर थांबविण्यात येणार आहेत.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा