Advertisement

बेस्टच्या चलो अॅपद्वारे वीज बिल भरा ऑनलाइन

नागरिक चलो अपद्वारे वीज बिल भरू शकतील.

बेस्टच्या चलो अॅपद्वारे वीज बिल भरा ऑनलाइन
SHARES

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST)ने नुकतीच घोषणा केली की, त्यांनी चलो अॅपमध्ये वीज बिल भरण्याचा पर्याय उलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता नागरिक चलो अपद्वारे वीज बिल भरू शकतील.

यापुढे, सर्व बेस्ट चलो अॅप वापरकर्ते अॅपद्वारे त्यांचे वीज बिल ऑनलाइन भरू शकतात. 10.50 लाख वीज ग्राहकांना चांगली सुविधा पुरवण्याच्या हेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

लोकेश चंद्र, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक म्हणाले, “मुंबईमध्ये अवघ्या 4 महिन्यांत बेस्ट चलो अॅप 15 लाखांहून अधिक प्रवाशांनी डाऊनलोड केले आहे. बेस्ट चलो अॅपला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि आमच्या वापरकर्त्यांसाठी हा एक अतिरिक्त फायदा आणि सोयीचा घटक असेल. बेस्ट चलो अॅपद्वारे ऑनलाइन बिल भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देऊन. यामुळे वीज बिल भरण्यासाठी बेस्ट काउंटरला येण्याची गरज नाही.”

ते पुढे म्हणाले, "ग्राहकाने वीज बिल पर्याय शोधण्यासाठी मेनूबारवर नेव्हिगेट करणे, त्यांचा ग्राहक क्रमांक प्रविष्ट करणे आणि ऑनलाइन पेमेंट करणे आवश्यक आहे."

बेस्टने असेही घोषित केले की, बेस्ट चलो कार्डसाठी ऑनलाइन रिचार्ज अॅपवर आणले गेले आहे. पुढील वेळी वापरकर्त्याने कंडक्टरच्या मशीनवर कार्ड टॅप केल्यावर रिचार्ज सक्रिय होईल.

डिसेंबर 2021 मध्ये, BEST ने 'पुढे चला' मार्केटिंग मोहिमेअंतर्गत, BEST चलो अॅप, बेस्ट चलो कार्ड आणि 72 नवीन BEST सुपर सेव्हर ट्रॅव्हल प्लॅनसह डिजिटल बस प्रवास उत्पादनांचा संच लाँच केला होता. BEST चलो अॅपने आतापर्यंत 15 लाखांहून अधिक डाउनलोड आणि 2 लाखांहून अधिक नवीन BEST चलो कार्ड जारी केल्यामुळे या उत्पादनांना जबरदस्त यश मिळाले आहे.

या डिजिटल सुविधांसह, प्रवाशांचा अनुभव सुधारणे आणि रायडरशिप वाढवणे हे बेस्टचे उद्दिष्ट आहे. पुढे, डिजिटल तिकिटांसह, उपक्रमासाठी रोख हाताळणी खर्च आणि पेपर रोलचा खर्च देखील कमी होईल.हेही वाचा

दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेटसक्ती, नाहीतर...

बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा