Advertisement

दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेटसक्ती, नाहीतर...

दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही आता हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेटसक्ती, नाहीतर...
SHARES

दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही आता हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी आज हे आदेश काढले आहेत. १५ दिवसांनी याबाबत कारवाई सुरू होणार असल्याचं पोलिसांनी या आदेशात म्हटलं आहे.

मोटार सायकल चालवताना हेल्मेट न वापरल्यास पाचशे रूपये दंड आणि तीन महिन्यासाठी गाडी चालवण्याचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच बाईक चालकासह मागे बसणाऱ्याला हेल्मेट बंधनकारक असेल. त्यामुळे मुंबईकरांना पंधरा दिवसांनी घराबाहेर पडताना हेल्मेट घालावे लागणार आहे.

मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी एक आदेश काढला आहे. मुंबईत जे दुचाकीवरून प्रवास करणारे जे प्रवासी आहेत. म्हणजेच चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील पुढच्या पंधरा दिवसात हेल्मेट वापरणं बंधनकारण असणार आहे.

पुढच्या पंधरा दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. जे नियम चालणार पाळणार नाहीत. त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांसाठी चालकाचा वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे पंधरा दिवसांनी मुंबईकरांना हेल्मेट घालून घराबाहेर पडावे लागणार आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी 6 एप्रिलपासून सुरू झालेल्या हेल्मेटविना वाहन चालवण्याच्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या 2,446 लोकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवला आहे.

पोलिसांनी 1,947 दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचे महत्त्व सांगितले आहे. याशिवाय, वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षेसाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत.हेही वाचा

विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना 'अशी' अद्दल घडवणार मुंबई ट्राफिक पोलिस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा