SHARE

सगळ्यांचं आवडत फास्ट फूड म्हणजे ‘पिझ्झा’… पिझ्झा म्हटलं कि बऱ्याच लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण प्रत्येक वेळेस टेस्टी आणि यमी पिझ्झासाठी डॉमिनोज, पिझ्झा हट, स्मोकिन जोस यांसारख्या ठिकाणी जाणं लोकांना परवडत नाही. पण तुमच्या खिशाला परवडेल असा पिझ्झा तुम्हाला मुंबईच्या रेल्वे स्थानकात मिळाला तर ? विश्वास बसत नाही ना...पण हे खरं आहे. येत्या काही दिवसात मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकात गरमागरम पिझ्झाची चव रेल्वे प्रवाशांना चाखता येणार आहे.


मुंबई सेंट्रल स्थानकात मिळणार पिझ्झा

‘आयआरसीटीसी’ने नवीन योजनेतंर्गत रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आहार पुरवता यावा यासाठी काही रेल्वे स्थानकात पिझ्झा वेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार पहिल पिझ्झा वेंडिंग मशीन पश्चिम रेल्वेमार्गावरील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात बसवण्यात येणार आहे. आयआरसीटीसी या रेल्वे कॅटरिंगची सेवा सांभाळणाऱ्या कंपनीनं पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात प्रायोगिक तत्वावर पिझ्झा वेंडिंग मशीन बसवण्याचं ठरवलं आहे.


कसा असेल हा पिझ्झा

पिझ्झा मशीनमध्ये वेजेटेरियन आणि नॉन वेजेटेरियन अशा दोन्ही प्रकारचे पिझ्झा मिळणार आहेत. या पिझ्झाची किंमत साधारण ७० ते २५० रुपये असणार आहे. तसंच मशीनमध्ये पैसे टाकल्यानंतर केवळ सात मिनिटात गरमागरम पिझ्झा खाण्यासाठी मिळेल. याशिवाय या मशीनमध्ये कॅशसोबतच डेबिट आणि क्रेडिट कार्डनेही पेमेंट करण्याचा पर्याय देण्याचा विचार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे केवळ पिझ्झा बेकिंग करण्यापासून ते त्यावरील सर्व खाद्यपदार्थांचे डिझाईन करण्याचं काम मशीनद्वारं केलं जाणार असून त्यासाठी सात मिनिटांचा अवधी मशीन घेणार आहे.हेही वाचा -

आयटीआय प्रवेशफेरी २ जुलैपासून
संबंधित विषय
ताज्या बातम्या