आयटीआय प्रवेशफेरी २ जुलैपासून

आयटीआयची पहिली प्रवेश फेरी २ जुलैला सुरू होणार असून या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ६ जुलैदरम्यान संबंधित संस्थेत जाऊन प्रवेश घेता येईल. आयटीआय प्रवेशाबाबत वेळापत्रक नुकतंच वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

SHARE

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यातील आयटीआय प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी २५ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. त्यानंतर आयटीआयची पहिली प्रवेश फेरी २ जुलैला सुरू होणार असून या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ६ जुलैदरम्यान संबंधित संस्थेत जाऊन प्रवेश घेता येईल. आयटीआय प्रवेशाबाबत वेळापत्रक नुकतंच वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.


मोफत मार्गदर्शन सत्र

दहावी, बारावी, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयटीआय या व्यवसाय शिक्षणासाठी महत्त्वाचा पर्याय मानला जातो. आयटीआय प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना २० जूनला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. तसंच विद्यार्थी-पालकांना प्रवेशप्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक प्रशिक्षण संस्थेत ३० जूनपर्यंत सकाळी १० ते ११ यावेळेच मोफत मार्गदर्शन सत्रही अायोजित करण्यात येणार आहेत.


विशेष फेरीचंही आयोजन

काही वेळा दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणं जमत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. हे प्रवेश २५ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होतील. या फेरीतील पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी १० ऑगस्ट रोजी जाहीर होईल.


आयटीआय प्रवेशाचं वेळापत्रक

 • ऑनलाइन अर्ज सादर करणे – २० जून सायंकाळी ५ पर्यंत
  प्रवेशअर्ज निश्चित करणे – २१ जून सायंकाळी ५ पर्यंत
  पहिल्या प्रवेशफेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करणे – २२ जून सायंकाळी ५ पर्यंत
 • प्राथमिक गुणवत्ता यादी – २५ जून सकाळी ११ वाजता
  गुणवत्ता यादी हरकती नोंद – २५ ते २६ जून सायंकाळी ५ पर्यंत
  अंतिम गुणवत्ता यादी – २८ जून सायंकाळी ५ वाजता
 • पहिली प्रवेशफेरी – २ जुलै सायंकाळी ५ वाजता
  पहिल्या यादीनुसार प्रवेश – ३ ते ६ जुलै
 • दुसरी प्रवेश फेरी – १२ जुलै सायंकाळी ५ वाजता
  दुसऱ्या यादीनुसार प्रवेश – १३ ते १७ जुलै
 • तिसरी प्रवेश फेरी – २४ जुलै सायंकाळी ५ वाजता
  तिसऱ्या यादीनुसार प्रवेश – २५ ते २८ जुलै
 • चौथी प्रवेश फेरी – ३ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजता
  चौथ्या यादीनुसार प्रवेश – ४ ते ८ ऑगस्टहेही वाचा-

मिशन अकरावी अॅडमिशनला लवकरच सुरुवात

आरटीईच्या दुसऱ्या सोडतीत २,३८२ विद्यार्थ्यांना प्रवेशसंबंधित विषय
ताज्या बातम्या