Advertisement

मिशन अकरावी अॅडमिशनला लवकरच सुरुवात


मिशन अकरावी अॅडमिशनला लवकरच सुरुवात
SHARES

दहावीचा निकाल ८ जूनला जाहीर झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेकडे लागलं आहे. यासंदर्भात मुंबईच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमवारी अकरावी प्रवेशप्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार येत्या बुधवार, १३ जूनपासून मिशन अकरावी अॅडमिशनला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया ४ ऑगस्टला संपणार आहे.


अकरावी प्रवेशप्रक्रियत अनेक बदल

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून अकरावी प्रवेशप्रक्रियेत बराच बदल करण्यात आला आहे. त्यानुसार यंदा प्रथमच बायफोकलचे प्रवेश ऑनलाइन होत आहेत. त्याशिवाय या प्रवेशप्रक्रियेचा कालावधीही वाढवण्यत आला आहे.

यंदा ज्या कॉलेजांचे ७० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत, त्यांनी कॉलेज सुरू करण्यास हरकत नाही. परंतु, त्यानंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नंतर एक्स्ट्रा तास घेऊन त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा, अशी सूचना संचालकांनी परिपत्रकात केली आहे.


बायफोकलचे प्रवेशाचे वेळापत्रक

 • बायफोकलचे पसंतीक्रम भरणे - १३ ते १८ जून
 • बायफोकलची पहिली गुणवत्ता यादी - २१ जून सकाळी ११ वा.
 • बायफोकलच्या पहिल्या यादीतील प्रवेश निश्चत करणे - २१ व २२ जूनला सायं. ५ वा.
 • बायफोकलच्या दुसऱ्या फेरीच्या रिक्त जागा जाहीर करणे - २३ जून, सकाळी ११ वा.
 • बायफोकलच्या दुसऱ्या फेरीसाठी पसंती क्रम भरणे - २३ ते २५ जून, स. ११ ते ५ (रविवार वगळून)
 • बायफोकलची दुसरी गुणवत्ता यादी - २८ जून, सकाळी ११ वा.
 • बायफोकलचे प्रवेश निश्चित करणे - २८ ते २९ जून स. ११ ते सायं. ५वा.
 • इतर शाखांचे प्रवेश वेळपत्रक
 • कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखांचे अर्ज भरणे - १३ ते २५ जून, सायं. ५ वाजेपर्यंत
 • कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसीसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी - २९ जून, सायं. ५ वा.
 • हरकती संबंधित शिक्षण उपसंचालक कार्यालयात विहित नमुन्यात दाखल करणे - ३० जून ते २ जुलै
 • हरकतीनुसार निवारण करणे - ३ जुलै, स. ११ वा.
 • गुणवत्ता यादी जाहीर कधी
 • पहिली गुणवत्ता यादी - ५ जुलै, स. ११ वा.
 • पहिल्या यादीतील प्रवेश निश्चित करणे - ६ ते ९ जुलै, स. ११ ते सायं. ५ वा. (रविवार वगळून)
 • रिक्त जागांचा तपशील आणि पहिल्या फेरीचा कट ऑफ जाहीर करणे - १० जुलै, स. ११ वा.
 • भाग १ व भाग २ भरण्यासाठी उपलब्ध करणे - १० व ११ जुलै, स. ११ ते सायं. ५ वा.
 • दुसरी गुणवत्ता यादी - १३ जुलै, दु. ४ वा.
 • दुसऱ्या यादतील प्रवेश निश्चित करणे - १४ ते १६ जुलै, स. ११ ते सायं. ५ वा. (रविवार वगळून)
 • रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे - १७ जुलै, स. ११ वा.
 • भाग १ आणि भाग २ भरण्यासाठी उपलब्ध करणे - १८ व १९ जुलै, स. ११ ते सायं. ५ वा.
 • तिसरी गुणवत्ता यादी - २३ जुलै, स. ११ वा.
 • तिसऱ्या यादतील प्रवेश निश्चित करणे - २४ व २५ जुलै, स. ११ ते सायं. ५ वा.
 • रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे आणि तिसऱ्या गुणवत्ता यादीतील कट ऑफ जाहीर करणे - २६ जुलै, स. ११ वा.
 • भाग १ व भाग २ भरण्यासाठी उपलब्ध करणे - २६ व २७ जुलै, स. ११ ते सायं. ५ वा.
 • चौथी गुणवत्ता यादी - २९ जुलै, स. ११ वा.
 • चौथ्या यादीतील प्रवेश निश्चित करणे - ३० ते ३१ जुलै, स. ११ ते सायं. ५ वा.
 • नियमित चार फेऱ्यांमधून प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरता बायफोकलमधील 
 • विषयाच्या रिक्त जागासाठी कॉलेजस्तरावर अर्ज घेऊन आरक्षण आणि गुणवत्तेनुसार प्रवेश देणे आणि ऑनलाइन अपलोड करणे - १ ते ४ ऑगस्ट
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा