Advertisement

लोकल किती वेळात येणार? हेही दिसणार, दिशा अॅपचं नवं फीचर!

फेब्रुवारी २०१६ ला दिशा लाँच करण्यात आलं होतं. सुरुवातीला अॅपमध्ये स्थानकांवरील वायफाय, आपात्कालीन वैद्यकीय कक्ष, स्थानक व्यवस्थापक कार्यालय, रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल यांची माहिती उपलब्ध होती. पण, आता पश्चिम रेल्वेने दिशा अॅपच्या सुधारित आवृत्तीचं लोकार्पण केलं आहे.

लोकल किती वेळात येणार? हेही दिसणार, दिशा अॅपचं नवं फीचर!
SHARES

पश्चिम रेल्वेने प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी दिशा अॅप सुरू केलं आहे. 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत फेब्रुवारी २०१६ ला दिशा लाँच करण्यात आलं होतं. सुरुवातीला अॅपमध्ये स्थानकांवरील वायफाय, आपात्कालीन वैद्यकीय कक्ष, स्थानक व्यवस्थापक कार्यालय, रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल यांची माहिती उपलब्ध होती. पण, आता पश्चिम रेल्वेने दिशा अॅपच्या सुधारित आवृत्तीचं लोकार्पण केलं आहे.


एका क्लिकवर लाइव्ह अपडेट

सुधारित दिशा अॅपनुसार स्थानकाच्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर किती मिनिटांमध्ये लोकल येईल, हे एका क्लिकवर पाहता येणार आहे. स्थानक स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांच्या किंमती देखील मोबाईलमध्ये पाहता येणार आहे. या अॅपमध्ये प्रवाशांनी लोकलचे लाईव्ह अपडेट देण्याची मागणी केली होती. सुधारित दिशा अॅप ट्रेन व्यवस्थापन यंत्रणेशी (टीएमएस) कनेक्टेड आहे. त्यामुळे मोबाईलच्या एका क्लिकवर स्थानकावरील कोणत्या प्लॅटफॉर्मवर किती वेळात लोकल येईल? याची माहिती मिळणं शक्य होईल. त्याचबरोबर ३० मिनिटे, ४५ मिनिटे आणि १ तास या तीन गटांमध्ये आगामी लोकलची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.


तक्रारींना आळा घालण्यासाठी अॅप

उशीराने येणाऱ्या लोकलची माहिती देखील प्रवाशांना मोबाईलमध्ये पाहता येणार आहे. रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्री केंद्रावर जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारीला आळा घालण्यासाठी सुधारित अॅपमध्ये प्रवाशांना स्थानकांतील खाद्यपदार्थांच्या किंमती दिसणार आहेत.



हेही वाचा

मोबाईल अॅपवर रोज विकली जातात लोकलची १० हजार तिकीटं!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा