• सांताक्रूझमध्ये 'सम-विषम' पार्किंग
  • सांताक्रूझमध्ये 'सम-विषम' पार्किंग
SHARE

सांताक्रूझ - येथील पूर्वत दुतर्फा वाहन पार्किंगमुळे वाहातुकीची समस्या उद्भवत आहे. त्यावर उपाय म्हणून सांताक्रूझ आणि विलेपार्ले या भागात असणाऱ्या वाहनांसाठी फक्त ‘सम-विषम’ पार्किंग योजना राबवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे.

"सांताक्रूझ व विलेपार्ले या पट्टयांतील रस्त्यावर दुतर्फा होणाऱ्या वाहन पार्किंगमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या संदर्भात अनेक तक्रारी वाहतूक विभागाला प्राप्त झाल्या होत्या.
त्यानुसार, वाहतुकीची ही समस्या सोडण्यासाठी या विभागाला ‘नो पार्किंग’ घोषित करण्यात आले आहे. तसेच ‘सम-विषम’ पार्किंग योजना सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे वाहनांची संख्या कमी होईल", असे अपर पोलीस आयुक्त(वाहतूक) सुनील पारसकर यांनी सांगितले.

येथे होईल ‘सम-विषम’ पार्किंग

टीपीएस 3 रोड क्रमांक 7 सांताक्रूझ (पू.) येथून खार सबवेपासून नेहरू रोड जंक्शन.

टीपीएस 3 रोड क्रमांक 7 खार सबवे (पू.) नेहरू रोड जंक्शन.

टीपीएस 3 रोड क्रमांक 7 सांताक्रूझ (पू.) अंतर्गत मार्ग क्रमांक 1 ते मार्ग क्रमांक 1 आणि मार्ग क्रमांक 8 ते मार्ग क्रमांक 11

संबंधित विषय
ताज्या बातम्या