Advertisement

आता 'ओला' देणार आपत्कालीन सेवा

मुंबईकरांना आता ओला कॅबच्या माध्यमातून आपत्कालीन सेवा मिळमार आहे.

आता 'ओला' देणार आपत्कालीन सेवा
SHARES

मुंबईकरांना आता ओला कॅबच्या माध्यमातून आपत्कालीन सेवा मिळमार आहे. मुंबईतील कोरोना रुग्णाव्यतिरिक्त कर्करोग, डायलिसिस किंवा अन्य आजार असलेल्या रुग्णांसाठी ओला कॅबने आपत्कालीन सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ओलाच्या या सेवेला शासनाकडूनही मंजुरी मिळाली आहे. सध्या मुंबईत बेस्ट व एसटी महामंडळ अत्यावश्यक सेवा देत आहेत. 

रिक्षा, टॅक्सी अत्यावश्यक सेवा देऊ शकतात. मात्र टाळेबंदीमुळं रिक्षा-टॅक्सीची अत्यावश्यक सेवा मिळणे कठीण झालं आहे. त्यामुळं आपत्कालीन परिस्थितीत मोबाइलवर आधारित खासगी टॅक्सींचा पर्याय ओलानं समोर आणला आहे. मुंबईव्यतिरिक्त बेंगळूरु, नाशिक, वाराणसी, इंदूर, भोपाळ यांसह एकूण १४ शहरांत आपत्कालीन सेवा देण्यात येत असल्याचं माहिती मिळते. 

ओला अ‍ॅपमध्ये ‘ओला इमर्जन्सी’ अशी स्वतंत्र श्रेणी असून त्यामार्फत प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. घर ते रुग्णालय अशी माहिती यात नमूद करावी लागेल. ओला अ‍ॅपमध्ये सध्या मुंबईतील जवळपास २०० रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यानंतर यांची संख्या वाढेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार कॅब चालकाकडून सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे. 

मास्क व सॅनिटायझरचा स्वत:बरोबरच प्रवाशांनाही वापर करण्यास सांगण्यात येणार आहे. वैद्यकीय कर्मचारी, पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही ओलानं स्वतंत्ररीत्या सेवा देण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा