Advertisement

बाय बाय 'पद्मिनी'...


बाय बाय 'पद्मिनी'...
SHARES

एकेकाळी मुंबईची ओळख असलेल्या काळी-पिवळी टॅक्सीला सध्या प्रवाशांची मागणी फार कमी मिळत आहे. या मागचं कारण म्हणजे मुंबईत आलेल्या अॅपबेस ओला-उबेर टॅक्सी. या टॅक्सीमुळं प्रवाशांना गारेगार व आरामदायी प्रवास करता येतो. तसंच, दिवसेंदिवस प्रवाशांची या टॅक्सी सेवेला मागणी वाढत आहे. अशातच काही वर्षांपूर्वी मुंबईकर प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सी आता बंद होणार आहेत.

मुंबईच्या टॅक्सी सेवेचं चित्र पूर्णपणे बदललंं आहे. मुंबईत जागतिकीकरणापूर्वी प्रीमियर पद्मिनी टॅक्सीची चलती होती. वर्षानुवर्षे चाललेल्या या गाड्या हळूहळू कमी होत गेल्या. मुंबईतील टॅक्सीसेवेत सध्या प्रीमियर पद्मिनी टॅक्सी कमी असून त्यांची संख्या केवळ ५० ते ६० पर्यंत मर्यादित राहिली आहे. प्रीमियर पद्मिनी टॅक्सी व्यतिरिक्त सध्या मुंबईतील पारंपरिक काळ्या-पिवळ्या टॅक्सीची संख्या कागदोपत्री ४५ हजार असून प्रत्यक्षात सुमारे ३५ हजार टॅक्सी चालत आहेत.

मात्र, आता ही काळी पिवळी टॅक्सी बंद होणार आहे. टॅक्सी युनियनच्या मते टॅक्सी बंद होण्यामागे अनेक कारणं आहेत. आयकॉनिक इंडो इटालियन मॉडेलची प्रीमियम पद्मिनी टॅक्सीचं प्रोडक्शन २००० मध्ये बंद झालं होतं. त्यानंतर, ५० टॅक्सी रस्त्यांवर धावत होत्या. परंतू, जून २०२० पासून ही टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावरुन धावणं बंद होणार आहे. दरम्यान, २०१३ साली वाढणारं प्रदूषण पाहता २० वर्ष जुन्या वाहनांवर प्रतिबंध लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळं या कार बंद करण्यात आल्या असून या आता इतिहास जमा होणार आहेत. असं असलं तरी पद्मिनीची कमी लोकांना कायम जाणवेल. कारण त्याच्याशी लोकांच्या भावना जोडल्या आहेत.

पद्मिनी टॅक्सी ही १९६४ साली फिअ‍ॅट 1100 डिलाइटच्या नावे बाजारात आली होती. हे फिअ‍ॅट 1100 चे स्वदेशी वर्जन होतं. मात्र, लॉन्चिंगच्या एक वर्षानंतर याचं नाव बदलून प्रीमिअर प्रेसिडेंट ठेवण्यात आलं. १९७४ साली पुन्हा याचं नाव बदलून प्रीमिअर पद्मिनी ठेवण्यात आलं. त्यावेळी हे नामकरण राणी पद्मिनीच्या नावे ठेवण्यात आलं होतं. हळुहळू या टॅक्सीची संख्या वाढत गेली असून, ९० च्या दशकात ६३ हजार २०० पद्मिनी टॅक्सी ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट मध्ये रजिस्टर करण्यात आली.

या टॅक्सीला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्याच पद्मिनी टॅक्सी या प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरत होत्या. कारण या टॅक्सीतून प्रवाशांना वजनी सामान नेता येत होतं. परंतु, सध्या मुंबईच्या रस्त्यावर धावत असलेल्या टॅक्सीमधून वजनी सामान नेता येत नसल्यामुळं प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत आहेत. तसंच, या प्रीमियर पद्मिनीचं वैशिष्ट्यं म्हणजे या गाडीचा देखभाल खर्च अतिशय कमी असून, तो परवडणारा होता. त्याशिवाय, या गाड्यांचे सुटे भाग मुंबईत कुठंही उपलब्ध होत होते. मुंबईत या गाडी बंद झाल्यानंतर आलेल्या गाड्या आकर्षक असल्या तरी त्या प्रीमियरच्या तुलनेत नाजूक आहेत.

‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सीचालक बेरोजगार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस के. एल. क्वॉड्रोस यांना विचारलं असता त्यांनी या चालकांना नव्या गाड्या घ्याव्या लागणार असल्याचं म्हटलं. तसंच, या नव्या गाड्या त्यांच्या परमीटवर घ्याव्या लागणार असल्याचं म्हटलं. त्याशिवाय या गाड्या स्क्रॅब करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा -

बँकांमध्ये होणार ५ दिवसांचा आठवडा

मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबाला पैसा खर्च करावा लागला, अभिजीत बिचकुलेचा आरोप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा