Advertisement

दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत वाहनांच्या खरेदीत वाढ

वाहन खरेदीसाठी गुढीपाडवा, दसरा, दिवाळीचा मुहूर्त साधला जातो. त्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते.

दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत वाहनांच्या खरेदीत वाढ
SHARES

दरवर्षी साडेतीन मुहूर्ताला नागरिक सोन्याच्या (gold) वस्तूंची, वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात करतात. परंतू यंदा कोरोनाचं सावट (corona) मुंबईसह राज्यावर असल्यानं वाहनांची खरेदी (vehicle purchase) मंदावली होती. मात्र, विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे दरऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनेकांनी गाड्यांची खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीत वाढ झाली असून, मुंबईतील ताडदेव, अंधेरी, वडाळा आरटीओत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन नोंदणी अधिक झाली आहे. केवळ बोरिवली आरटीओत (mumbai rto) वाहन नोंदणी कमी झाली.

४ही आरटीओत मिळून ५९९ वाहनांची नोंद झाली असून दुचाकींना अधिक पसंती दिली आहे. वाहन खरेदीसाठी गुढीपाडवा, दसरा, दिवाळीचा मुहूर्त साधला जातो. त्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. गतवर्षी ८ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरीवली आरटीओत २९८ वाहनांची नोंद झाली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी प्रवासासाठी स्वत:चं वाहन खरेदी करण्याला पसंती दिली आहे. सार्वजनिक वाहतुकीतील वाहनांना असलेली गर्दी आणि दिवसभरासाठी भाड्यानं घेतलेल्या वाहनांचे दर पाहता स्वत:चे वाहन खरेदी करण्याकडं कल आहे. मुंबईत दसऱ्याच्या दिवशी ५९९ वाहनांची खरेदी झालेली असून यामध्ये ४०४ दुचाकी, तर २०५ चारचाकी वाहनं आहेत. वाहन खरेदी वाढल्यामुळं २ कोटींपेक्षा अधिक महसूल आरटीओला मिळाला आहे.

दसऱ्याचा मुहूर्त

  • वडाळा आरटीओत यंदा १७० वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये १२७ दुचाकी व ५३ चारचाकी वाहने आहे. गेल्या वर्षी ३८ दुचाकी व चारचाकी चार वाहनांची नोंद झाली होती. 
  • अंधेरी आरटीओतही दुचाकी १५० आणि चारचाकी ९१ वाहनांची नोंद अशा २४१ वाहनांची नोंद झाली असून २०१९ मध्ये १११ दुचाकी आणि ८१ चारचाकी वाहनांची खरेदी  झाली. 
  • ताडदेव आरटीओही यात मागे राहिलेले नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १६० दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी होतानाच यामध्ये १०६ दुचाकी असल्याचं समजतं. २०१९ मध्ये फक्त ४१ वाहनांची नोंद होती. 
  • बोरिवली आरटीओतील वाहन नोंदणी मात्र कमी झाली आहे. 
  • २०१९ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर १९४ वाहन नोंदणी झालेली असताना यंदा ती घसरून २८ झाली आहे. 
  • केवळ २१ दुचाकी व ७ चारचाकी वाहने आहेत.


हेही वाचा -

मुंबईत कोरोनामुळं १० हजारांपेक्षा अधिक मृत्यू

महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस किती? मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांच्या बैठकीत होणार निर्णय


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा