Advertisement

मुंबईत कोरोनामुळं १० हजारांपेक्षा अधिक मृत्यू

मुंबईत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांच्या संख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

मुंबईत कोरोनामुळं १० हजारांपेक्षा अधिक मृत्यू
SHARES

मार्च महिन्यात मुंबईत प्रवेश केलेल्या कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत गेला. मुंबईत दररोज ७०० ते १००० कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळत होते. त्याचसोबत मृताचा (deathआकडाही वाढत होता. सध्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत कमी असला तरी, एकट्या मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

कोरोनामुळं १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झालेले मुंबई हे देशातील पहिलं शहर ठरलं आहे. मुंबईतील कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या काल १० हजार १६ वर पोहचली होती. तर, एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ५० हजार ६१ वर पोहोचली आहे. तर, महापालिकेच्या आकडेवारीनुसार (bmc) काल ८९८ रुग्ण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत एकूण २ लाख १९ हजार १५२ जण मुंबईत कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना प्रादुर्भावाचा वेग देशभरास राज्यात काहीसा मंदावल्याचे दिसत असले, तरी देखील अद्यापही नव्या करोनाबाधितांसह कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होताना दिसतच आहे. राज्यात मुंबई व पुणे या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८८ टक्क्यांवर पोहचलं आहे. तर रुग्ण दुप्पटीचा काळ सरासरी १२० दिवसांवर पोहोचला आहे.

राज्यात रविवारी कोरोनानं ११२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत रविवारी दिवसभरात १२२२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे १२२२ नवे रुग्ण, ४६ जणांचा दिवसभरात मृत्यू

महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस किती? मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांच्या बैठकीत होणार निर्णय


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा