Advertisement

कुर्ला-सायनदरम्यान लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, तर दोघेजण जखमी


कुर्ला-सायनदरम्यान लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, तर दोघेजण जखमी
SHARES

मध्य रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री ऐन गर्दीच्या वेळेस लोकल ट्रेनमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू तर दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना तातडीने उपचरांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


कुठे घडली घटना?

मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि सायन अशा दोन स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.  ही लोकल रात्री साडेनऊच्या सुमारास कुर्ला ते सायन स्थानकादरम्यान असताना गर्दीच्या रेट्यामुळे तीन प्रवासी खाली पडले.  

ही घटना घडल्यावर जीआरपी कंट्रोल रुमला या अपघाताबाबतचा फोन आला. त्यानंतर हमालांनी या तिघांना उचलून घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. तिथं एका प्रवाशाला डाॅक्टरांनी  मृत घोषित केलं. तर इतर दोन जखमी प्रवाशांना नंतर सायन रुग्णालयात हलवण्यात आलं. जखमी प्रवाशांची नावे अद्याप कळू शकलेली नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा