Advertisement

'एक राष्ट्र, एक कार्ड'ची अद्याप चाचणीच सुरू

मुंबईतील विविध वाहतूक सेवेतून एकाच तिकीटाच्या माध्यमातून प्रवास करणं आता शक्य होणार आहे.

'एक राष्ट्र, एक कार्ड'ची अद्याप चाचणीच सुरू
SHARES

मुंबईतील विविध वाहतूक सेवेतून एकाच तिकीटाच्या माध्यमातून प्रवास करणं आता शक्य होणार आहे. यासाठी 'एक राष्ट्र, एक कार्ड' योजनेची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमानं मागील ५ महिन्यांपूर्वी घेतला होता. मात्र, योजनेतील कार्डाची अद्याप तांत्रिक चाचणी सुरू आहे. प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागू नये आणि रोख व्यवहार टळावा या उद्देशाने हे कार्ड बनविण्यात येणार आहे.

'एक राष्ट्र, एक कार्ड' हे कार्ड बेस्ट बस, रेल्वे, मेट्रो, मोनोचे तिकीट काढण्यासाठी वापरता येणार आहे. या कार्डसाठी वापरण्यात येणाऱ्या हार्डवेअरच्या चाचणीला कुलाबा आणि वडाळा आगारात ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात करण्यात आली. यानंतर प्रत्यक्षात बसमध्येही त्याची चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी बेस्टच्या ५ ते १० कर्मचाऱ्यांना हे कार्ड देऊन प्रयोग करण्यात येणार आहे.

प्रवासात हे कार्ड बेस्ट वाहकाला दाखवावं लागणार आहे. वाहक यंत्राद्वारे कार्डची वैधता तपासून प्रवाशाला तिकीट देईल. या कार्डमधूनच प्रवाशाच्या तिकिटाचे पैसे अदा केले जातील. त्यासाठी कार्ड रिचार्ज करणं व त्यात पैसे असणं गरजेचं आहे. यामध्ये काही तांत्रिक समस्या येतात का ते पाहिले जाईल आणि त्यानंतरच योजनेला अंतिम स्वरूप दिलं जाणार आहे. हेच कार्ड रेल्वे, मेट्रो, मोनोसाठीही वापरता येईल. त्यामुळं प्रवास झटपट व रोख रकमेशिवाय करणं शक्य होईल.

गेल्या पाच महिन्यांपासून या कार्डची चाचणीच सुरू आहे. बेस्ट, सिडॅक, एक खासगी बँक व अन्य यंत्रणा या चाचणीत सहभागी आहेत. कर्मचाऱ्यांना प्रयोगासाठी डमी कार्ड देऊन त्याची चाचणी करण्यात येणार आहे. कार्डमधून पैसे अदा होतात का, त्याची माहिती प्रवाशालाही मिळते का, कार्ड यंत्राद्वारे तपासताना अन्य काही तांत्रिक समस्या येते का याची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानंतरच प्रवाशांना कार्ड देण्यात येणार आहे.



हेही वाचा -

राज्यात १२,५०० पोलिसांची भरती करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

वाढत्या कोरोनामुळं दादरच्या बाजाराचे पुन्हा स्थलांतर?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा