रिक्षा-टॅक्सीचा प्रवास स्वस्तात हवाय? मग या सर्व्हेमध्ये मत नोंदवा!

  Nariman Point
  रिक्षा-टॅक्सीचा प्रवास स्वस्तात हवाय? मग या सर्व्हेमध्ये मत नोंदवा!
  मुंबई  -  

  राज्यातील रिक्षा-टॅक्सीचे प्रवासीभाडे, त्यांचे टप्पे काय असावेत हे ठरवणे, यासह वाहतुकीचा दर्जा या बाबींसंदर्भात ऑनलाईन सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यात सहभागी होऊन ग्राहक, टॅक्सीचालक, रिक्षाचालक आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांनी येत्या 15 मेपर्यंत आपली मते नोंदवावीत, असे आवाहन रिक्षा-टॅक्सीचे भाडेसूत्र ठरवण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष बी. सी. खटुआ यांनी केले आहे.

  नरिमन पॉईंट येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, समितीचे सदस्य आणि माजी परिवहन आयुक्त दिलीप जाधव उपस्थित होते.

  रिक्षा-टॅक्सीचे दरसूत्र निश्चित करण्यासाठी मते मागवण्यात येत असून त्यांचे विश्लेषण करून शासनाला साधारण जून 2017 अखेर अहवाल सादर करण्याचा प्रयत्न असेल. ग्राहक, टॅक्सी चालक, रिक्षा चालक आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांनी आपली मते नोंदवून हे सर्व्हेक्षण जास्तीत जास्त चांगले होण्यासाठी मदत करावी 

  - बी. सी. खटुआ, अध्यक्ष, रिक्षा-टॅक्सी भाडेसूत्र समिती

  सर्व्हेक्षण अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी समितीने व्यापक प्रमाणावर रिक्षाचालक, टॅक्सी चालक, त्यांच्या संघटनांना तसेच जनतेला त्यांची मते समितीकडे मांडण्यासाठी ऑनलाईन सर्व्हेक्षण करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध्‍ा करून देण्यात आले आहेत. हे अर्ज 15 मे पर्यंत भरून दिल्यानंतर समिती त्याचे विश्लेषण करून शासनाकडे अहवाल पाठवणार आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांना चांगले उत्पन्न मिळण्याबरोबरच ग्राहकांना आरामदायी आणि किफायतशीर दरात सेवा मिळावी यादृष्टीने दर ठरवण्यासाठी हे सर्व्हेक्षण उपयोगात येणार आहे. सेवेचा दर्जा उंचावण्यासाठीही या सर्व्हेक्षणाचा उपयोग होणार आहे, असेही खटुआ यावेळी म्हणाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.