लोकलमधून धूर निघाल्यानं मानखुर्दला प्रवासी भयभीत


SHARE

मानखुर्द - मानखुर्द रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या कपलिंगमधून अचानक धूर येऊ लागल्यानं प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर दोन डब्यांना जोडणाऱ्या कपलिंगमध्ये घर्षण होऊन हा धूर निघत असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकारानंतर वाहतूक वेळापत्रकानुसारच झाल्याचं मानखुर्दचे स्थानक प्रबंधक संजय चौधरी यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या