मेट्रोच्या पासधारकांसाठी अमर्यादित प्रवासाची सुविधा

मेट्रोच्या पासधारकांना मेट्रोनं (Metro) कितीही वेळा प्रवास करता येणार आहे.

SHARE

मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १ (Ghatkoper-Varsova Metro-1) मार्गावरील पासधारकांसाठी (Passholders) आनंदाची बातमी आहे. कारण आता या पासधारकांना मेट्रोनं (Metro) कितीही वेळा प्रवास करता येणार आहे. पासधारक प्रवाशांना आतापर्यंत ही सुविधा नव्हती. यापूर्वी जेवढा प्रवास कराल त्या प्रमाणात पैसे वजा करण्यात येत होते. परंतु, आता रेल्वेप्रमाणे (Railway) मेट्रोमधूनही महिनाभरात कितीही वेळा पासनं प्रवास करणं शक्य झालं आहे. ही सुविधा गुरुवारपासून सुरू करण्यात आली असून, तिला किती प्रतिसाद मिळतो चाचपणी ६ महिने करण्यात येणार आहे.

मेट्रोन प्रवास करण्यासाठी प्रवाशांना टोकन घ्यावं लागतं. अनेक प्रवासी या प्रवासासाठी दररोज टोकन खरेदी करतात. तर काही प्रवासी एकदाच आपलं कार्ड रिचार्ज (Card Recharge) करतात. या सुविधेसह मेट्रो १ कंपनीनं पेपर क्यूआर (Paper OR), मोबाइल तिकिट (Mobile Ticket) आदी सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. पासधारकांना मात्र, या बाबतीत अडचणींना तोंड द्यावे लागत होतं.

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या पासधारक प्रवाशांना प्रवासासाठी पास घेतला की कितीही वेळा प्रवास करता येतो. परंतु, मेट्रोच्या पासधारक (Metro Passholders) प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध नव्हती. जेवढा प्रवास कराल तेवढ्या प्रमाणात पासमधून रक्कम वजा होत होती. त्यामुळं महिनाभराचा पास आधीच संपून जात होता. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन मेट्रो प्रशासनानं प्रवाशांना आता अमर्यादीत सेवेची सुविधा दिली आहे.

मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयानुसार प्रवाशांना उपनगरीय रेल्वेच्या धर्तीवर या पासचा वापर करता येणार आहे. या पासची मुदत एक महिना असणार असून गुरूवापासून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

पेपर क्यूआर तिकीट

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतर्फे पेपर क्यूआर तिकीट सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळं इतर तिकीट माध्यमांच्या व्यतिरिक्त प्लास्टिक टोकन तिकीटचा वापर थांबविणं शक्य होणार आहे. मेट्रो-१ च्या म्हणण्यानुसार, दररोज मेट्रोच्या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल १.८० लाख प्लास्टिक टोकन देण्यात येतं. मेट्रोचं प्लॅस्टिक टोकन तिकीट हे ३ ग्रॅमचं असतं. त्यामुळं कागदाच्या तिकीटचा वापर केल्यास ५०० किलोग्रॅम प्लास्टिकचा वापर टाळत येईल. तसंच, प्लास्टिक प्रदूषण रोखण्यातही मदत होणार आहे. ही तिकीट यंत्रणा निश्चित करण्यासाठी मेट्रो-१ च्या सर्व १२ स्थानकांवर पेपर क्यूआर तिकीट यंत्रणा बसविण्यात येणार आहे.हेही वाचा -

राज्यव्यापी महाअधिवेशन : राज ठाकरे करणार नव्या झेंड्याचं अनावरण

'सरकारचे १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री जाणार अयोध्येला'संबंधित विषय
ताज्या बातम्या