'सरकारचे १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री जाणार अयोध्येला'

राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi government) १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जातील, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी ट्विटरवरून दिली आहे.

SHARE

राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi government) १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जातील, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी ट्विटरवरून दिली आहे. मात्र उद्धव ठाकरे केव्हा अयोध्येला जातील, याची निश्चित तारीख मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

महाविकास आघाडीचं सरकार जोरात कामाला लागलं असून हे सरकार ५ वर्षे पूर्ण करणार आहे. या सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला (ayodhya) जाऊन श्रीरामाचं (shree ram) दर्शन घेतील, असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

हेही वाचा- अयोध्या दौरा हा केवळ मतांसाठी, अशोक चव्हाणांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

याआधी नोव्हेंबर २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा (ayodhya visit) करून ‘रामलल्ला’चं (ram lalla) दर्शन घेतलं होतं. त्यानंतर बाबरी मस्जिद-रामजन्मभूमी (babri ram janmabhumi disputes) जमीन वादग्रस्त प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर २०१९ रोजी पुन्हा एकदा अयोध्या दौरा करण्याची घोषणा केली होती. राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला होता.

परंतु आता महाविकास आघाडी सरकार स्थिरस्थावर झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर जाण्याचं निश्चित केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अयोध्या दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे. याआधी केलेल्या अयोध्या दौऱ्यात त्यांनी लोकसभेआधी (lok sabha) भाजपवर (bjp) अप्रत्यक्षरीत्या दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. भाजप सातत्याने राम मंदिर उभारण्याचा मुद्दा उपस्थित करून निवडणुका लढवते परंतु अद्याप राम मंदिराची (ram mandir) एकही वीट रचण्यात आलेली नाही. राम मंदिराबाबत समाधानकारक निर्णय न आल्यास शिवसेना (shiv sena) राम मंदिर उभारण्यात पुढाकार घेईल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला राम मंदिरावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. 

त्यानंतर लोकसभा आणि पुढं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका भाजप- शिवसेनेने हिंदुत्वाच्या (hindutva) नावावर युती करत जिंकल्या. परंतु सत्ता वाटपातील पेचामुळे ही युती टिकू शकली नाही. त्यानंतर शिवसेनेने धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीसोबत (ncp) मिळून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं (maha vikas aghadi) सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्वावर भाजपकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

हेही वाचा- आजच्या दिवशी बाळासाहेब हवे होते, अयोध्या निकालावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

ही संधी ओळखून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (mns) हिंदुत्ववादी विचारसरणीची वाट चोखाळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसं झाल्यास भाजप मनसेसोबत भविष्यात युती करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा शिवसेनेला (shiv sena) फटका बसू शकतो, हे गृहित धरून या दौऱ्याची आखणी करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. 

उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौरा करून नाराज शिवसैनिकांना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न करतील, असं यातून दिसून येत आहे.     

संबंधित विषय
ताज्या बातम्या