• गोरेगाव स्टेशनला डेब्रिजचा विळखा
  • गोरेगाव स्टेशनला डेब्रिजचा विळखा
  • गोरेगाव स्टेशनला डेब्रिजचा विळखा
SHARE

गोरेगाव - सिमेंट, लादी आणि वाळू हे डेब्रिज गेल्या 15 दिवसांपासून गोरेगाव स्थानकावर पडून आहे. यामुळे प्रवाशांना रोज अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जर समोरून एखादी जलद गतीची लोकल गेल्यास प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कंटाळा आल्याची प्रतिक्रिया प्रवासी कुंदन यांनी दिली आहे.

याबाबत स्टेशन अधिकक्षक दिनेश धोरजे यांना विचारले असता, स्टेशनची उंची वाढवण्याची, पत्रे बदलण्याचं काम सुरू असून लवकरच ते काम पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं

संबंधित विषय
ताज्या बातम्या