Advertisement

पत्ता शोधण्यासाठी मेट्रोच्या खांबांची मदत


पत्ता शोधण्यासाठी मेट्रोच्या खांबांची मदत
SHARES

मेट्रो मार्गाची उभारणी करताना उभारलेल्या सिमेंटच्या खांबांवर क्रमांक टाकण्यात येणार आहेत. या क्रमांकामुळे मुंबईकरांना आपला पत्ता आणि ठिकाण तसेच या मार्गावरील कोणतीही जागा शोधणे सहज शक्य होणार आहे. ही संकल्पना सर्वप्रथम मेट्रो ७ (लाल) आणि मेट्रो २ ए (पिवळा) या मार्गांवर राबवण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून जवळपास ८ मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे.

यापैकी मेट्रो ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) आणि मेट्रो २ ए (डीएन नगर ते दहिसर) हे प्रकल्प पुढील वर्षी जूनपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत रूजू होणार आहेत. अशावेळी #MumbaiInMinutes हे सूत्र राबवत अधिक परिणामकारक करण्यावर प्राधिकरणाचा भर आहे.

मेट्रो स्थानक परिसरातील गर्दीतही सहप्रवाशास, आपण कुठे आहोत याची योग्य माहिती मिळावी, यासाठी खांब मदतशीर ठरतील. या खांबांमुळे या मार्गांलगतच्या इमारती, दुकाने सहज शोधता येतील, असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त करण्यात येत आहे. हीच संकल्पना पुढील सर्व मेट्रो मार्गांवर राबवणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा