Advertisement

मुंबई विमानतळावरील काळ्या-पिवळ्या प्रिपेड टॅक्सीच्या भाड्यात वाढ

नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबई विमानतळावरील काळ्या-पिवळ्या प्रिपेड टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई विमानतळावरील काळ्या-पिवळ्या प्रिपेड टॅक्सीच्या भाड्यात वाढ
SHARES

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबई विमानतळावरील काळ्या-पिवळ्या प्रिपेड टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळवरून प्रिपेड टॅक्सीने किमान सहा किलोमीटर अंतरावरील ठिकाणी जाण्यासाठी आता १४० रुपये, तर देशांतर्गत विमानतळाबाहेरून या टॅक्सी चार किलोमीटर अंतरासाठी ९३ रुपये मोजावे लागणार आहेत.

यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरून प्रिपेड टॅक्सीतून सहा किलोमीटर प्रवास करण्यासाठी १२७ रुपये, तर देशांतर्गत विमानतळवरून चार किलोमीटर प्रवासासाठी ८५ रुपये मोजावे लागत होते.

आता या टॅक्सीने देशांतर्गत विमानतळावरून आठ किलोमीटर प्रवासासाठी १७९ रुपये, तर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १६ किलोमीटर प्रवासासाठी ३५८ रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रात ९२ रिक्षा-टॅक्सी थांब्यांनाही मान्यता देण्यात आल्याची माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये ७३ रिक्षा थांबे, सात शेअर रिक्षा थांबे, नऊ टॅक्सी थांबे आणि तीन शेअर टॅक्सी थांबे यांचा समावेश आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा