Advertisement

सीएसटी-पनवेल उन्नत मार्गावर धावणार खासगी कंपनीच्या लोकल?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल उन्नत जलद मार्गाची बांधणी खासगी कंपनीतर्फे (पीपीपी मॉडेल) करण्यात येत आहे.

सीएसटी-पनवेल उन्नत मार्गावर धावणार खासगी कंपनीच्या लोकल?
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल उन्नत जलद मार्गाची बांधणी खासगी कंपनीतर्फे (पीपीपी मॉडेल) करण्यात येत आहे. मागील १० वर्ष हा मार्ग चर्चेत असून, आता मार्गाच्या बांधणीसाठी नियुक्ती केलेल्या कंपनीकडूनच या मार्गावर लोकल चालविण्यात येणार असल्याचं समजतं. याबाबत एका कंपनीनं मुंबई रेल्वे विकास महामंडळाशी (एमआरव्हीसी) पत्रव्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय, या विषयावरून कंपनीसोबत सध्या चर्चाही सुरू असल्याची माहिती सोमवारी झालेल्या खासदारांच्या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

खासदारांची बैठक

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी मुख्यालयात सोमवारी खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सीएसटी-पनवेल उन्नत प्रकल्पासोबतच एमयूटीपीच्या प्रकल्पांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी एमयूटीपीच्या रखडलेल्या प्रकल्पाबाबत खासदारांनी ‘एमआरव्हीसी’ व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसंच, 'एमयूटीपी-३ ए मधील उन्नत प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करा आणि हार्बर प्रवाशांना दिलासा द्या. पश्चिम रेल्वेवरील उन्नत प्रकल्प गुंडाळला, किमान हार्बर मार्गावरील प्रकल्प तरी पूर्ण करा', अशी मागणी खासदारांनी केली.

कामाला अद्याप मुर्हूत नाही

सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग पूर्ण झाल्यास ७५ मिनिटांचा प्रवास ४५ मिनिटांत करणं सहज शक्य होणार आहे. प्रवाशांचा वेळही वाचणार असून त्यांना निश्चित ठिकाणी वेळेत पोहोचण्यास मदत होणार आहे. परंतु. या प्रकल्पाच्या कामाला अद्याप मुर्हूत मिळालेला नाही. त्यामुळं हा मार्ग कधी तयार होणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.



हेही वाचा -

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांचा राजीनामा अखेर मंजूर

ब्रिटिश एअरवेजचे वैमानिक संपावर, मुंबईहून लंडनला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा