Advertisement

सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होईल- नितीन गडकरी

लाॅकडाऊनमुळे देशातील विविध भागात अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या घरी जाण्यासाठी लवकरच विमान, रेल्वे आणि बस अशी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होईल- नितीन गडकरी
SHARES

लाॅकडाऊनमुळे देशातील विविध भागात अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या घरी जाण्यासाठी लवकरच विमान, रेल्वे आणि बस अशी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. कोरोनाचा फैलाव होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून बंद असलेली सार्वजनिक वाहतूक सेवा अत्यंत कडक नियम घालूनच सुरू करण्यात येईल, असंही ते म्हणाले. 

हेही वाचा - तूर्तास, मुंबईतून मजुरांसाठी एकही ट्रेन सुटणार नाही, राज्य सरकारने केलं स्पष्ट

स्वच्छता पाळावी लागेल

नितीन गडकरी यांनी बस आणि कार ऑपरेटर संघटनेच्या सदस्यांशी चर्चा करताना ही माहिती दिली. यावेळी गडकरी म्हणाले, सार्वजनिक प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होऊ शकते. त्यासाठी नियमावली तयार केली जात आहे. सध्या केवळ केवळ ग्रीन झोनमध्येच बस आणि कारच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली आहे. सार्वजनिक बस, कार सेवा सुरक्षित असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करावा लागेल त्यासाठी तोंडावर मास्क हवा, सॅनिटाइजेशन झालं पाहिजे, हात धुतले पाहिजे. वाहन मालकांच्या समस्यांची मला जाणीव आहे आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी सगळ्या प्रकारे मदत केली जाईल, असं गडकरी यांनी सांगितलं.

अर्थव्यवस्था बदलेल

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन असे सर्वजण प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांच्या आपण सतत संपर्कात आहोत. कोरोना संकटातून देश लवकरच बाहेर येईल. आता चीनसोबत कोणीही व्यापार करू इच्छित नाही. अशा परिस्थितीचा आपण फायदा घ्यायला हवा. जपानने चीनमध्ये उत्पादन करणाऱ्या आपल्या देशातील कंपन्यांना चीन सोडण्यासाठी मोठं पॅकेज देऊ केलं आहे. अशा कंपन्या भारतात आल्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि संपूर्ण परिस्थिती बदलेल, अशी आशाही गडकरी यांनी व्यक्त केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा