Advertisement

Live : रेल्वे प्रशिक्षणार्थींनी घेतली राज ठाकरेंची भेट


Live : रेल्वे प्रशिक्षणार्थींनी घेतली राज ठाकरेंची भेट
SHARES

रेल्वे अॅप्रेंटिसला असलेल्या प्रशिक्षणार्थी यांनी मंगळवारी सकाळी माटुंगा रेल्वे स्थानकावर चक्काजाम आंदोलन सुरू केलं. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे ऐन सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांची मोठी पंचाईत झाली.


३.०० - ८०० ते १००० विद्यार्थ्यांवर गुन्हा  दाखल

१.२५ - प्रशिक्षणार्थी आंदोलकांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

१.०३ - शिवसेना खासदार रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला

१.०० - प्रशिक्षणार्थी आंदोलक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला 


१२.०८ - रेल्वे आंदोलनामुळे वाहतूक कोंडी

१२.०५ - पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

 


 

 १० .४९ - प्रशिक्षणार्थींचं रेल्वे भरती आंदोलन मागे

१०.४८ - 'रेल्वेत १२४०० जागा रिक्त, ३१ मार्चपर्यंत प्रवेश परीक्षा' खासदार राहुल शेवाळे यांची माहिती

१०.४५ - खासदार राहुल शेवाळेंनी मध्य रेल्वेच्या डीआरएमशी केली चर्चा 

१०.४३ - लांब पल्ल्यांच्या गाड्या  सोडण्यास सुरुवात

१०.४१ - रेल्वे ट्रॅक मोकळा करायला सुरुवात


 

१०.४० - तब्बल पाच तासानंतर आंदोलनकर्त्यांनी मार्ग केला मोकळा, अप डाऊन मार्गावरील एक-एक गाड्या सोडल्या

१०.३८ - खासदार राहुल शेवाळे यांची मध्य रेल्वेच्या डी आर एम बरोबर चर्चा, १२ हजार जागांसाठी ३१ मार्चपर्यंत चाचणी घेण्याचं आश्वासन 

१०.३७ - कल्याण भिवंडी मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी

१०.३६ - रेल्वे आंदोलनामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम

१०.३५ - मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी

१०.३४ - मध्य रेल्वेची वाहतूक कुर्ला स्थानकापर्यंत

१०.३१ - तब्बल चार तासानंतर डोंबिवली ते ठाणे ही पहिली लोकल निघाली 

१०.२५ - माटुंग्यापासून बेस्टच्या जादा बसगाड्या


मुंबइकरांचे हाल

रेल्वेने प्रशिक्षणार्थी म्हणून मान्यता दिली, मात्र कोणत्याही रेल्वे भरतीमध्ये विचार केला जात नसल्याच्या विरोधात देशभरातले रेल्वे प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटिस) उमेदवार मंगळवारी सकाळीच मुंबईत दाखल झाले. माटुंगा रेल्वे स्टेशनवर त्यांनी सकाळी ७ च्या सुमारास आंदोलन सुरू केले. त्यामुळे मुंबइकरांचे मात्र चांगलेच हाल झाले.


प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसगाड्या 

दरम्यान, आंदोलनामुळे मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाने डेपो मॅनेजर यांना जादा गाड्या चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत.


रेल्वे प्रशासनाकडून दखल

अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाल्याचे पाहून रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. 'या प्रशिक्षणार्थी रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेतली जाईल. यासाठी त्यांनी ३० मार्च पर्यंत अर्ज भरून सादर करायचे आहेत', अशी माहिती मध्य रेल्वेचे सीपीआरओ सुनील उदासी यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना दिली.

मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या आश्वासनाने आंदोलकांचं अद्याप समाधान झालेलं नाही. त्यामुळे अजून किती वेळ मुंबईकरांना आंदोलनाचा फटका बसेल, याविषयी साशंकता आहे.

दरम्यान, या आंदोलनाची आधीच हाक दिलेली असताना प्रत्यक्ष आंदोलन होईपर्यंत प्रशिक्षणार्थींशी प्रशासनाने चर्चा का केली नाही? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा