Advertisement

रेल्वेतील 'सीसीटीव्ही कॅमेरा'साठी १० लाखांची तरतूद

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातही या कामासाठी केवळ १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रेल्वेतील 'सीसीटीव्ही कॅमेरा'साठी १० लाखांची तरतूद
SHARES

मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेवरील लोकल, मेमू, डेमू गाड्यांच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचा संकल्प सोडण्यात करण्यात आला. मात्र, ३ वर्षे होत आली तरीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत रेल्वेकडून हालचाली झालेल्या नाहीत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातही या कामासाठी केवळ १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरून रात्री किंवा पहाटेच्या सुमारास प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातच महिला डब्यात पुरुष प्रवाशांची घुसखोरी होते. अपंगांच्या डब्यातही सामान्य प्रवासी घुसखोरी करतात. अपंगांच्या डब्यातून बेकायदा प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र असे प्रकार घडूच नये आणि घुसखोर, गुन्हेगारी प्रवृत्तींना जरब बसावी यासाठी लोकलसह सर्व रेल्वेगाड्यांच्या डब्यांत १० हजार ३४९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय साधारण ३ वर्षांपूर्वी घेण्यात आला होता.

फेब्रुवारी २०१८च्या केंद्रीय अर्थसंकल्पात त्याला मंजुरीही देण्यात आली होती. हे काम ‘रेल टेल’ करणार होती. यासाठी ३५५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, या योजनेत आतापर्यंत एकही कॅमेरा बसवण्यात आलेला नाही. मध्य रेल्वेच्या मुंबई व्यवस्थापैकीय विभागाकडूनच लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यात कॅमेरे बसवले जात आहेत. मात्र, गेल्या २ वर्षांपासून ते कामही धिम्या गतीनं होत आहे.



हेही वाचा -

आॅनलाईन उपस्थितीवर विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

मुंबईतील सांडपाण्याचा 'या' कामासाठी होणार वापर


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा