आर्थिक मंदीचा फटका रेल्वे यंत्रणेला

रेल्वे मंत्रालय पैशांच्या टंचाईला तोंड देत असल्यामुळे पीएमओने परवानगी दिल्यानंतर याच महिन्यात मंत्रालय भाडेवाढीचे धोरण तयार करणार आहे.

SHARE

जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम भारताच्या आता रेल्वे यंत्रणेवर ही दिसू लागला आहे. त्यामुळेच की काय, रेल्वेच्या प्रवासी भाडे वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेच्या या निर्णयाला पंतप्रधान कार्यालयाने ही रेल्वे मंत्रालयाला परवानगी दिली आहे. त्यामुळे याच महिन्यात नवीन भाडेवाढीचे धोरण तयार करण्यात येणार आहे.

जागतिक आर्थिक मंदीचा फटका भारतातील अनेक खासगी संस्थांना बसला असतानाच, या मंदीचा परिणाम आता भारतातील सरकारी यंत्रणांवर ही पडत आहे. रेल्वे मंत्रालय पैशांच्या टंचाईला तोंड देत असल्यामुळे पीएमओने परवानगी दिल्यानंतर याच महिन्यात मंत्रालय भाडेवाढीचे धोरण तयार करणार आहे. आर्थिक वाढीचा दर अपेक्षेपेक्षा कमी राहिल्यामुळे रेल्वेला माल वाहतुकीतून कमी महसूल मिळाला आहे. याशिवाय वेगववान आणि स्पर्धातम्क रस्ते वाहतूक उपलब्ध असल्यामुळे रेल्वे आधीच दडपणाखाली आहे.

विशेष म्हणजे प्रवासी मिळवण्याच्या आघाडीवर विचार करता रेल्वेला विमानसेवेचे आव्हान आहे. कारण विमान कंपन्या रेल्वेच्या तुलनेत कमी भाडे आकारतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या देखील कमी असते. प्रवासी मिळविण्याच्या आघाडीवर विचार करता रेल्वेला विमानसेवेचे आव्हान आहे कारण विमान कंपन्या रेल्वेच्या तुलनेत कमी भाडे आकारतात. पायाभूत सुविधांची कामे पाहणा-या सचिवांच्या बैठकीत पीएमओने भाडेवाढीला हिरवा कंदिल दाखविला आहे.

हेही वाचा ः- एलटीटी-डबलडेकर एक्स्प्रेला ७ अतिरिक्त डबे


संबंधित विषय
ताज्या बातम्या