Advertisement

रेल्वे प्रवाशांनाही ‘झीरो एफआयआर’ करता येणार


रेल्वे प्रवाशांनाही ‘झीरो एफआयआर’ करता येणार
SHARES

रेल्वे प्रवासादरम्यान कोणताही गुन्हा घडल्यास प्रवासी अाता झीरो एफआयआर दाखल करू शकणार आहेत. प्रवाशांनी एफआयआर दाखल केल्यानंतर त्याची चौकशी रेल्वे पोलिस तातडीने सुरू करणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबतच्या समस्या कमी होण्याची शक्यता आहे.


मध्य प्रदेशात प्रायोगीक तत्त्वावर 

रेल्वे प्रवासादरम्यान चोरी, दरोडे, महिलांची छेडछाड अादी तक्रारी मोबाइलच्या माध्यमातून  घेण्यास सुरूवात झाली अाहे. मध्य प्रदेशात प्रायोगीक तत्त्वावर ही सुविधा राबवण्यास सुरूवात झाली अाहे. त्यानंतर संपूर्ण देशात ही सुविधा सुरू केली जाईल. प्रवाशांच्या तक्रारीनंतर तातडीने रेल्वे पोलिस त्याची चौकशी सुरू करणार आहेत.


लेखी अर्ज नाही

जेथे गुन्हा घडला अाहे तेथे तक्रार न करता दुसरीकडे कुठेही तक्रार दाखल केली जाते याला झीरो एफअायअार म्हटलं जातं. झीरो एफअायअारमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर ती तक्कार संबंधित पोलिस स्टेशनकडे पाठवली जाते. यामध्ये पोलिस हद्दीचा वाद अाणू शकत नाही. सध्या तक्रारदारांना एक अर्ज भरून द्यावा लागतो. पण झीरो एफअायअारमध्ये प्रवाशांना लेखी तक्रार अर्ज द्यायची गरज नाही. 



हेही वाचा - 

भाडेवाढीसाठी २७ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा एल्गार

मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर प्रवाशांसाठी नवीन इंडिकेटर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा