Advertisement

भाडेवाढीसाठी २७ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा एल्गार


भाडेवाढीसाठी २७ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा एल्गार
SHARES

महागाई वाढत असताना रिक्षाची भाडेवाढ मात्र गेल्या तीन वर्षांत झालेली नाही, असं म्हणत आता रिक्षाचालक भाडेवाढीसाठी आक्रमक झाले आहेत. किमान प्रति किमी १८ वरून २१ रुपये प्रति किमी भाडं करावं या मागणीसाठी मुंबईसह राज्यभरातील रिक्षाचालक २७ नोव्हेंबरला संपावर जाणार असल्याची माहिती मुंबई रिक्षामन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. तर भाडेवाढीसह इतर प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाही तर त्यानंतर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.


काय आहेत मागण्या?

रिक्षाचालकांच्या सामजिक आणि आर्थिक विकासासाठी रिक्षाचालक कल्याण महामंडळ स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. पण अद्याप हे महामंडळ प्रत्यक्षात आलेलं नाही. त्यामुळे हे महामंडळ त्वरित स्थापन करावी, अशी मागणी राव यांनी केली आहे. तर गेल्या तीन वर्षांत महागाई वाढत असताना रिक्षाची भाडेवाढ मात्र ३ वर्षांत झालेली नाही. 

त्यामुळे हकीम कमिटीच्या अहवालानुसार भाडेवाढ लागू करण्याचीही रिक्षाचालकांची मागणी आहे. या अहवालानुसार भाडेवाढ लागू करण्यास वेळ लागेल. त्यामुळे अंतरिम भाडेवाढ म्हणून प्रति किमी १८ रुपयावरून प्रति किमी २१ रुपये भाडेवाढ द्यावी, अशीही मागणी रिक्षाचालकांची आहे.


दिवाळीनंतर आंदोलन

या आणि अशा कित्येक प्रलंबित मागण्या आहेत. मात्र सरकार याकडे काणाडोळा करत आहे. म्हणूनच आम्ही सरकारला एक महिन्याचा वेळ देतो. या एक महिन्यात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईसह राज्यभर रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर निदर्शनं करतील, रिक्षा वाहतूक बंद ठेवतील, असंही राव यांनी सांगितलं आहे. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना त्रास नको यासाठी दिवाळीनंतर आंदोलन छेडण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा