Advertisement

मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर प्रवाशांसाठी नवीन इंडिकेटर


मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर प्रवाशांसाठी नवीन इंडिकेटर
SHARES

मध्य रेल्वे मार्गाच्या ३५ उपनगरीय स्थानकांवरील जुने इंडिकेटर काढून त्याजागी नवे एलईडी इंडिकेटर लावण्यात आले आहेत. मे महिन्यापसून सुरू झालेल्या या कामाच्या पहिल्या टप्प्यात १३ स्थानकांवर नवीन एलईडी इंडिकेटर बोर्ड लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आतापर्यंत १० उपनगरीय स्थानकांवर एलईडी इंडिकेटर लावण्यात आले आहेत.


कुठल्या स्थानकांचा समावेश?

अंबरनाथ, बदलापूर, विठ्वालवाडी, शेलू, भिवपुरी रोड, शहाड, आंबिवली, टिटवाळा, कसारा आणि डोंबिवली या स्थानकांवर नवीन इंडिकेटर लावण्यात आले आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकांवर नवीन इंडिकेटर लावण्याचं काम सुरु असून या वर्षाच्या अखेरीस हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.


दुसऱ्या टप्प्यातील स्थानकं

या कामाच्या दुसऱ्या टप्प्यात २२ उपनगरीय स्थानकांवर एलईडी इंडिकेटर बोर्ड लावण्यात येणार आहेत. कळवा, मुंब्रा, दिवा, ठाकुर्ली, कोपरखैरणे, ठाणे, माटुंगा, सायन, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, नाहूर, भांडुप, मुलुंड, उल्हासनगर, नेरळ, कर्जत, वाशींद, आसनगांव, आटगांव, खरडी आणि खडवली या स्थानकांवर इंडिकेटर लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणं हे काम पुढच्या वर्षातील मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



हेही वाचा-

डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता फिरतं ग्रंथालय

'डबल डेकर लोकल' सुरू करा, उच्च न्यायालयाचे रेल्वे प्रशासनाला निर्देश



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा