Advertisement

डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता फिरतं ग्रंथालय

मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेस या २ गाडयांमध्ये रेल्वेच्या सहकार्याने फिरत्या वाचनालयाचा उपक्रम सुरू होत आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करताना वाचनाचा आनंद मिळणार आहे.

डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता फिरतं ग्रंथालय
SHARES

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात 'वाचन प्रेरणा दिन' साजरा केला जातो. मागील ३ वर्षांत या दिवसाला लोकचळवळीचं स्वरुप प्राप्त झालं असून यंदाच्या वर्षापासून रेल्वेमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सची (फिरतं ग्रंथालय) अभिनव संकल्पना सुरू करण्यात येत आहे.

येत्या १५ ऑक्टोबरपासून या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेस या २ गाडयांमध्ये रेल्वेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू होत आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करताना वाचनाचा आनंद मिळणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.


वाचनदूत करणार मदत

मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई-पुणे) आणि पंचवटी एक्स्प्रेस (मनमाड-मुंबई-मनमाड) या २ गाड्यांमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सचा (फिरते ग्रंथालय) उपक्रम सुरू होत आहे. १५ ऑक्टोबर, २०१८ रोजी रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने या अभिनव उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे.


प्रतिसाद द्या

१५ ऑक्टोबरपासून या दोन्ही रेल्वे गाड्यांमधील मासिक पासधारकांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेने नेमलेले 'वाचनदूत' प्रवाशांना विनाशुल्क वाचनसेवा देण्यास सुरुवात करणार आहेत. संबंधित प्रवाशांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद द्यावा, असं आवाहन तावडे यांनी केलं आहे.


वेळ काय?

१५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुंबई सीएसएमटीमधून सायंकाळी ५.१० मिनिटांनी पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि ६.१५ मिनिटांनी सीएसटीएमवरुन नाशिककडे जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ही वाचन सेवा सुरू करण्यात येणार आहे.



हेही वाचा-

B. Com. नंतर BMS ची परीक्षाही ढकलली पुढे

यंदा शाळेला दिवाळीची सुट्टी कमी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा