Advertisement

यंदा शाळेला दिवाळीची सुट्टी कमी


यंदा शाळेला दिवाळीची सुट्टी कमी
SHARES

जूनपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील विविध इयत्तांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं दिवाळीची नियोजित सुट्टी कमी करण्याचा निर्णय मुख्याध्यापक संघटनेतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळ यंदा दिवाळीची सुट्टी तीन ते चार दिवसांनी कमी करण्यात येणार आहे.


म्हणून सुट्ट्या रद्द

यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात झालेला मुसळधार पाऊस, मराठा मोर्चा, भारत बंद यांसारख्या विविध कारणामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनातर्फे घेण्यात आला होता. आरटीईनुसार सर्व शाळांनी राष्ट्रीय आणि बँक हॉलिडे सुट्ट्यांसह एकूण ७६ सुट्ट्या देणं बंधनकरक असलं तरीही भारत बंद, मराठा क्रांती मोर्चा यामुळे द्यावी लागणारी सुट्टी आणि पावसामुळे द्यावी लागलेली सुट्टी या सर्वांचं अतिरिक्त तासिकांचा नियम कसा पूर्ण करायचा हा प्रश्न सर्व मुख्याध्यापकांसमोर उभा राहिला आहे. 


२० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी

या सुट्ट्या भरून काढण्यासाठी आता आगामी दिवसात सुट्ट्या कमी करून अतिरिक्त तासांचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळीची सुट्टी ४ नोव्हेंबरपासून सुरू होत असून २० नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी देण्याचा निर्णय शाळा प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे.


शिक्षण हक्क कायदा काय सांगतो

शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील प्राथमिक शाळांसाठी वर्षात २०० दिवस आणि माध्यमिक शाळांसाठी २३० कामांचे दिवस होणं बंधनकारक आहेत. तर अनेक शाळा प्रामुख्याने इंग्रजी कॉन्व्हेंट शाळा तासिकांचा नियम पाळतात. या नियमानुसार प्राथमिक ८०० तास आणि माध्यमिक शाळा १ हजार तासांचं नियोजन करून शाळा भरवतात. अनेक शाळा या तास निहाय शाळांचं वेळापत्रक आखून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्टी देतात.

मुंबईत पावसामुळे जी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टी भरून काढण्याचं प्रमुख आवाहन आता आमच्यासमोर असणार आहे. या सुट्टी भरून काढण्यासाठी अतिरिक्त तास किंवा दिवाळी आणि इतर सुट्ट्या कमी कराव्या लागणार असून प्रत्येक शाळा त्यांच्या सोयीनुसार याचे नियोजन करणार आहेत.
- प्रशांत रेडीज, सचिव, मुख्याध्यापक संघटना

दरवर्षी दिवाळीची सुट्टी ही फक्त वीस दिवसांची असते, परंतु यंदा ही सुट्टी कमी करण्यात येत असून अनेक शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करत आहे. त्याशिवाय यंदा दिवाळीच्या सुट्टीतही अनेक शिक्षकांना सहामाही परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करावी लागली तर त्यांना कुटुंबासाठी वेळ मिळणार नाही, अशी भीतीही शिक्षकांना सतावत आहे.
- राजेश पांड्या, अध्यक्ष, टिचर्स डेेमोक्रेटिक फ्रंट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा