Advertisement

B. Com. नंतर BMS ची परीक्षाही ढकलली पुढे

मुंबई विद्यापीठाने बीएमएसची परीक्षा एक दिवस पुढे ढकलली आहे. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजी होणारा बीएमएसचा पेपर ३ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यापुढील पेपर नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.

B. Com. नंतर BMS ची परीक्षाही ढकलली पुढे
SHARES

चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) आणि एसवाय बीएमएस सेमिस्टर तीनची परीक्षा एकाच दिवशी आल्याने मुंबई विद्यापीठाने बीएमएसची परीक्षा एक दिवस पुढे ढकलली आहे. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजी होणारा बीएमएसचा पेपर ३ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यापुढील पेपर नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.


कारण काय?

मुंबई विद्यापीठाची हिवाळी सत्राची एसवाय बीएमएसच्या सेमिस्टर तीन (चॉइस बेस), एसवाय बीएमएस सेमिस्टर तीन या अभ्यासक्रमांची परीक्षा २ नोव्हेंबर रोजी होणार होती. याच दिवशी सीएची परीक्षा होणार असल्यान विद्यापीठाने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परीक्षेच्या वेळापत्रकात अल्पसा बदल केला आहे.


३ नोव्हेंबरला पेपर

त्यानुसार संबंधित अभ्यासक्रमांची परीक्षा २ नोव्हेंबरऐवजी ३ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याच मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळवण्यात आले आहे.

याआधी चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) आणि एसवाय बीकॉम सेमिस्टर तीनची परीक्षा एकाच दिवशी आल्यान एसवाय बीकॉमची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती.



हेही वाचा-

एसवाय बीकॉमचा पेपर एक दिवसांनी पुढे ढकलला

लॉ च्या नव्या परीक्षांविरोधात विद्यार्थी कोर्टात; १९ ऑक्टोबरला सुनावणी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा