Advertisement

एसवाय बीकॉमचा पेपर एक दिवसांनी पुढे ढकलला


एसवाय बीकॉमचा पेपर एक दिवसांनी पुढे ढकलला
SHARES

चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) आणि एसवाय बीकॉम सेमिस्टर ३ ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने मुंबई विद्यापीठाने बीकॉमची परीक्षा एका दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या २ नोव्हेंबर रोजी होणारा बीकॉमचा पेपर ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यापुढील पेपर मात्र नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.


विद्यार्थ्यांच्या सोईसाठी

मुंबई विद्यापीठाची हिवाळी सत्राची एसवाय बीकॉम सेमिस्टर ३ (चॉइस बेस), एसवायबीकॉम सेमिस्टर तीन (ए अँड एफ)-(चॉइस बेस) या अभ्यासक्रमांची परीक्षा २ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र या दिवशी सीएची परीक्षा होणार असल्याने विद्यापीठाने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परीक्षेच्या वेळापत्रकात थोडासा बदल केला आहे.
विभागाकडून स्पष्ट

त्यानुसार संबंधित अभ्यासक्रमांची परीक्षा २ नोव्हेंबर ऐवजी ३ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचं मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.हेही वाचा-

'त्या' ८३३ विद्यार्थ्यांचं राज ठाकरेंना साकडं

'असं' आहे दहावीचं संभाव्य वेळापत्रकRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा