Advertisement

कारवाई करूनही विनातिकीट प्रवाशांची गर्दी कमी होईना


कारवाई करूनही विनातिकीट प्रवाशांची गर्दी कमी होईना
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून सतत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. अस असलं तरी या प्रवाशांची संख्या कमी होत नाही. मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गांवर ६० हजारपेक्षा जास्त विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले आहेत. निर्बंध घातलेले असतानाही सर्वसामान्य प्रवासी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेळेत लोकलमधून प्रवास करीत आहेत.

सर्वसामांन्य नागरिकांना १ फेब्रुवारीपासून सकाळी ७ पर्यंत आणि दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ नंतर लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रवास वेळेच्या बंधनाच्या नियमाची अंमलबजावणी करताना सुरुवातीचे २ दिवस स्थानकातील प्रवेशद्वारांवर रेल्वे पोलीस व तिकीट तपासनीस तैनात होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवास वेळेत ओळखपत्र व तिकीट दाखवूनच स्थानकात प्रवेश दिला जात होता. 

स्थानकातील सर्वच प्रवेशद्वार खुले असल्यानं आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस तैनात करणे अशक्य असल्याने त्या वेळेतही सर्वसामान्य प्रवासी बिनदिक्कतपणे स्थानकात प्रवेश मिळवून लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर प्रवेशद्वारांवरील पोलीस काढण्यात आले. हीच बाब हेरून अनेक जण स्थानकात सहज प्रवेश मिळवून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या प्रवास वेळेतही स्थानकात प्रवेश करीत आहेत. तिकीट खिडक्यांवर तिकीट न मिळाल्यास ते विनातिकीट प्रवास करीत आहेत.

कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डहाणू ते बोरिवली येथे वास्तव्यास असलेले खासगी कार्यालयातील नोकरदार तसेच अन्य कामानिमित्त बाहेर पडणारे प्रवासी रस्तेमार्गे जाण्याऐवजी झटपट प्रवासासाठी लोकल प्रवासाचा पर्याय निवडताना दिसतात. तिकीट मिळाले नाही, तरी विनातिकीट प्रवास करतात. १ फे ब्रुवारीपासून वेळेच्या बंधनाची अट घालून सर्वांसाठी लोकल सुरू झाल्यानंतरही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झालेले नाहीत.

फेब्रुवारी महिन्यात मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकात ५५ हजारपेक्षा जास्त विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. यामध्ये मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकात सर्वाधिक ४५ हजार, तर पश्चिम रेल्वेवर १५ हजार ९९६ विना तिकीट प्रवाशांचा समावेश आहे. जून २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत पश्चिम रेल्वेवर ५९ हजार ६६८ उपनगरीय प्रवाशांवर विनातिकीट प्रवास के ल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती, तर या कालावधीत मध्य रेल्वेवर एक लाख सात हजार प्रवाशांना पकडण्यात आले होते.

सकाळी ७ नंतर ते दुपारी १२ याच वेळेत अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. या वेळेत सर्वाधिक खासगी कार्यालयातील नोकरदार वर्ग आणि अन्य सर्वसामान्य प्रवासीही मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे याच वेळेत सर्वच स्थानकात मोठ्या संख्येने तिकीट तपासनीस असतात.

मध्य रेल्वेवर उपनगरीय स्थानकात ५०० तिकीट तपासनीस आणि लोकलमध्ये तिकीट तपासणीसाठी १५० कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे समजतं.

पश्चिम रेल्वेने फेब्रुवारी महिन्यात ३९ लाख ९६ हजार, तर मध्य रेल्वेने ९४ लाख रुपये दंड वसूल केला आहे. जून २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत या दोन्ही रेल्वे मार्गांनी विनातिकीट उपनगरीय प्रवाशांकडून एकूण ४ ते ५ कोटी रुपये दंडवसुली केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा