Advertisement

महिलांच्या रेल्वे प्रवासासाठी मध्य व पश्चिम रेल्वेची तयारी

महाराष्ट्र शासनाकडून पत्र मिळाल्यामुळं रेल्वेनं या प्रवासास परवानगी दिली आहे.

महिलांच्या रेल्वे प्रवासासाठी मध्य व पश्चिम रेल्वेची तयारी
SHARES

रेल्वे प्रशासनानं (railway) बुधवारपासून महिला प्रवाशांना सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० दरम्यान आणि सायंकाळी ७.०० नंतर उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये (mumbai local) प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. महिलांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी देण्याची रेल्वे नेहमीच तयार होती. अशातच महाराष्ट्र शासनाकडून पत्र मिळाल्यामुळं रेल्वेनं या प्रवासास परवानगी दिली आहे.

सध्यस्थितीत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी मार्गावर १४०६ विशेष उपनगरी सेवा चालवत आहे. मध्य रेल्वेनं (central railway) सोमवारी २२५ उपनगरी सेवांची वाढ केली असून लोकल फेऱ्यांची संख्या आता ७०६ झाली आहे. तसंच, पश्चिम रेल्वेनं (western railway) गुरुवारी १९४ सेवा वाढविल्या असून बुधवारपासून ४ महिला विशेष सेवांची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वे आपल्या मार्गावर ७०४ उपनगरी सेवा चालविणार असून, त्यामध्ये ६ महिला विशेष (ladies spacial) आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवारपासून एकूण १४१० विशेष उपनगरी सेवा चालविण्यात येणार आहे.

स्थानकांवर येणार्‍या प्रवाशांची तपासणी

  • सकाळी ११ ते दुपारी ३.०० दरम्यान आणि संध्याकाळी ७.०० नंतर महिलांचे कोणतेही क्यूआर कोड / ओळखपत्र  चेकिंग होणार नाही.
  • केवळ तिकिट तपासलं जाणार आहे. कारण या वेळेत सर्व महिलांना प्रवासाची परवानगी आहे.
  • इतर वेळी प्रत्येकास क्यूआर कोड / ओळखपत्र व वैध तिकिटांनुसार तपासणी करावी लागेल.
  • राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक श्रेणीतील कर्मचारी व महिलांनी (सकाळी ११ ते दुपारी ३.०० दरम्यान आणि सायंकाळी ७.०० नंतर) वगळता इतरांनी स्थानकांवर गर्दी करू नये अशी विनंती केली जाते.
  • प्रवाशांनी कोविड-19 संबंधित असलेल्या आदेशानुसार वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे अनुसरण करावे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा