Advertisement

'मोदी एक्सप्रेस' कोकणकडे रवाना


'मोदी एक्सप्रेस' कोकणकडे रवाना
SHARES

मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवला. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या मोदी एक्सप्रेसमधून एकूण १८०० प्रवासी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना झाले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली. गेल्या वर्षी चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी चाकरमान्यांना एक्सप्रेसची खास व्यवस्था केली. 

मंगळवारी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी या एक्सप्रेसला रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवला. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करतानाच टाळ मृदुंग वाजवत चाकरमानी कोकणाच्या दिशेनं रवाना झाले. यावेळी चाकरमान्यांनी गणपतीची आरतीही घेतली. ही स्पेशल एक्सप्रेस काही खास स्टेशन घेऊन कोकणात दाखल होणार आहे.

दादर ते वैभववाडी करून सावंतवाडीत ही ट्रेन थांबणार आहे. १८ डब्यांची ही ट्रेन असून १८०० प्रवासी या एक्सप्रेसमधून जात आहेत. त्यांना एकवेळचं जेवणही आम्ही दिलं आहे. ही सोय पहिल्यांदाच झाली आहे. रावसाहेब दानवे यांनी मोदी एक्सप्रेसमध्ये येऊन प्रवाशांना अन्न वाटप केलं. तसेच तुम्ही कुठून आलात? कुठे जाणार आहात? किती दिवस कोकणात राहणार आहात? तुमच्यासोबत कुटुंबातील कोण कोण आहेत? तुमची प्रकृती चांगली आहे ना?, अशी विचारपूस करतानाच प्रवास करताना आणि कोकणात गेल्यावरही कोरोना नियमांचे पालन करा, मास्क लावूनच घराबाहेर पडा, अशा सूचनाही त्यांनी प्रवाशांना दिल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा