Advertisement

मुंबई ते मांडवा रो रो सेवेला 'इतका' प्रतिसाद

गणेशोत्सवादरम्यान रो रो सुरू करण्यात आली. परंतु, आता या सेवेला निम्मा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई ते मांडवा रो रो सेवेला 'इतका' प्रतिसाद
SHARES

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई ते मांडवा या रो रो सेवेची सुरुवात झाली. मात्र लगेचच लॉकडाऊनमुळे ही सेवा ठप्प झाली. त्यानंतर गणेशोत्सवादरम्यान रो रो सुरू करण्यात आली. परंतु, आता या सेवेला निम्मा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. ई-पासचे निर्बंध हटविल्यानंतर रो रो सेवेला शनिवार-रविवारी ५० टक्के तर आठवड्याच्या इतर दिवसांमध्ये सरासरी ४० टक्के प्रतिसाद मिळत आहे.

पुढील आठवड्यापासून दररोज दोन फेऱ्या नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मिळते. सध्या आठवड्याच्या दिवसात रोज २ फेऱ्या नियमितपणे सुरू असून, शनिवार-रविवारी त्यामध्ये दुपारच्या वेळी आणखी एका फेरीची वाढ करण्यात येत आहे. एमटूएम फेरीजने पुढील आठवड्यासाठीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे.

रो रो सेवेमध्ये एकावेळी ५०० प्रवासी, १४० वाहनांना परवानगी आहे. सध्या आठवड्याच्या दिवसात ३० ते ४० टक्के  प्रवासी, तर सुमारे ३० वाहने प्रवास करतात असे एमटूएम फेरीजच्या प्रवक्त्याने सांगितले. तर आठवड्याच्या अखेरीस सरासरी ५० टक्के  प्रवासी आणि सुमारे ६० वाहने रो रोने प्रवास करतात.

ई-पासचे निर्बंध हटविल्यानंतर अनेकांनी स्वत:च्या वाहनाने शहराबाहेर प्रवास सुरू केले आहेत. मात्र रो-रोच्या प्रवाशांत मोठी वाढ झालेली नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा