मुंबईकरांना घडणार हवाई सफर

 Pali Hill
मुंबईकरांना घडणार हवाई सफर

मुंबई - नवी मुंबई, ठाणे येथून मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आता हवाईसफर घडणार आहे. माथेरानबरोबरच नवी मुंबई ते घाटकोपर आणि बोरिवली ते ठाणे या मार्गांवर रोप वे सुरू करण्याचा निर्णय एमएमआरडीएने शुक्रवारी घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास कमी वेळात आणि सुखकर होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून, ह्या विषयावर विचारमंथन सुरू होतं.

असा असेल रोप वे

मार्ग - बोरिवली संजय गांधी उद्यान ते ठाणे घोडबंदर रोड

अंतर - 11 किमी

अपेक्षित खर्च - 12 हजार ते 15 हजार कोटी रुपये

मार्ग - वाशी, नवी मुंबई ते घाटकोपर बसडेपो

अंतर - 8 किमी

अपेक्षित खर्च - 800 ते 900 कोटी रुपये

Loading Comments