लोहमार्ग पोलिसांनी केली बॅग परत

 Churchgate
लोहमार्ग पोलिसांनी केली बॅग परत

चर्चगेट - बोरीवली या लोकलमधुन शुक्रवारी सायंकाळी प्रवास करत असताना प्रथम वर्गाच्या डब्यात स्नेहा श्रियान वय 28 वर्ष नावाच्या महिलेची बॅग डब्यात आढळून आली. ही महिला लता अपार्टमेंट कुलुपवाडी नॅशनल पार्क बोरिवली पूर्व या ठिकाणी राहते. लोहमार्ग पोलिसांनी बॅगेची तपासणी केल्यावर बॅगेत मॅक बुक, एअर कंपनीचा लॅपटॉप, गुलाबी रंगाचे पाकीट त्यामध्ये 10,200 रोख रक्कम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि पॅन कार्ड असे साहित्य होते. लोहमार्ग पोलिसांनी या महिलेला संपर्क साधुन याबाबात माहिती दिली. या वस्तुंची किंमत अंदाजे 1 लाख 10 हजार रुपये एवढी होती. याची खात्री करून लोहमार्ग पोलिसांनी त्या महिलेला बॅग सुपूर्द केली.

Loading Comments