महिलांनो..रेल्वेतून प्रवास करताना काळजी घ्या!

Mumbai  -  

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेमधून रोज लाखो महिला प्रवास करतात. या प्रवासादरम्यान कित्येकदा महिलांना छेडछाडीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या घटना लक्षात घेत कुर्ला रेल्वे पोलिसांनी महिलांसाठी सुरक्षा ड्राईव्हचे आयोजन केले होते. यावेळी रेल्वे पोलिसांनी महिलांना लोकलमध्ये सुरक्षेचे धडे दिले.

तसेच रेल्वेमध्ये जे विक्रेते येतात त्यांच्याकडून सामान घेणे टाळा असं आवाहन देखील यावेळी महिलांना करण्यात आले. तुम्ही जर सामान खरेदी केले नाही तर हे विक्रेते आपोआप कमी होतील आणि तुमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार नाही अशा प्रकारे यावेळी जनजागृति करण्यात आली.

दरम्यान, यावेळी काही महिलांनी अशा विक्रेत्यांसाठी रेल्वेने फलाटावर स्टॉल उभारून द्यावेत जेणेकरून हे फेरीवाले डब्यात येणार नाहीत, अशी मागणीही केली.

Loading Comments