Advertisement

फॅन्सी नंबर प्लेट पडणार महाग, आता दंड नाही तर होणार 'ही' शिक्षा

तुमची नंबर प्लेट फॅन्सी असेल तर लवकरात लवकर बदला. नाहीतर याचे परिणाम भोगायला तयार रहा.

फॅन्सी नंबर प्लेट पडणार महाग, आता दंड नाही तर होणार 'ही' शिक्षा
SHARES

मुंबईमध्ये आता कार आणि मोटारसायकलला फॅन्सी नंबर प्लेट लावणं महाग पडू शकतं. नुकतंच मुंबईत आरटीओ अधिकाऱ्यांना यासंदर्भात एक आदेश देण्यात आला आहे. फॅन्सी नंबरप्लेट धारकांना समज दिल्यानंतरही बदल न झाल्यास त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तुमची नंबर प्लेट फॅन्सी असेल तर लवकरात लवकर बदला. नाहीतर याचे परिणाम भोगायला तयार रहा.

नाहीतर परवाने रद्द

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०१९ महिन्याच्या मध्यापर्यंत सुमारे २००० वाहनचालकांना ई चलन पाठवण्यात आलं आहे. या चालकांचे नंबर प्लेट्स देवनागरीमध्ये किंवा काहीशा फॅन्सी अंदाजामध्ये आहेत. फॅन्सी नंबरप्लेट वापरल्यास वाहनधारकाला सुमारे १००० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. यामध्ये राजकीय मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिक समावेश असल्याचंही समोर आलं. २०१८ मध्ये सुमारे ९००० दुचाकीस्वारांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांची मागणी

तसंच सगळ्या राज्यांमध्ये एकाच प्रकारचा नियम असावा असं मत देखील आरटीओ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. अनेकदा इतर भाषीक नंबरप्लेट वाचायला वेळ लागतो किंवा ती चटकन समजणं शक्य नसतं. ती गाडी गुन्ह्यात सहभागी असेल तर त्यावर कारवाई करताना अडचण येऊ शकते. त्यामुळे देशभर इंग्रजी भाषेतच नंबरप्लेट असावी, असी मागणी देखील अधिकाऱ्यांनी केली आहे


मुंबईत गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

सायन पूल बंद केल्यास परिसरात मोठी वाहतुककोंडीची समस्या


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा