मुंबईतील वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला सायन पूलाची दुरूस्ती करण्यात येणार आहे. या दुरूस्तीच्या कामासाठी हा पूल बंद ठेवण्यात येणार होता. पंरतू, चुनाभट्टी व बीकेसीला जोडणारा नवा पूल वाहतुकीसाठी अद्याप खुला झालेला नाही. त्यामुळं सायन पूल बंद केल्यास या परिसरात मोठी वाहतुककोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळं ही समस्या ठाळण्यासाठी चुनाभट्टी व बीकेसीला जोडणारा नवा पूल वाहतुकीसाठी खुला होत नाही, तोपर्यंत सायन पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
सद्यस्थितीत सायन पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलाची तत्काळ डागडुजी करणं गरजेचं आहे. त्यामुळं तातडीनं दुरुस्ती करावी, असा अहवाल आयआयटीच्या तज्ज्ञांनी दिला. सन २०१८मध्ये अंधेरी पूल दुर्घटनेनंतर सायन पुलाकडंहा लक्ष देण्यात आले होतं. . परंतु, चुनाभट्टी-बीकेसी पूल खुला होत नाही, तोपर्यंत सायन पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यास वाहतूक विभागानं परवानगी दिलेली नाही.
एमएसआरडीसीनं अजयपाल मंगल कंपनीला पुलाच्या दुरुस्तीचं कंत्राट दिलं असून, त्यासाठी साधारणपणं ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुलाची दुरवस्था झाल्यानं अपघात घडू नये याकरता सध्या या पुलावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे.
चुनाभट्टी ते बीकेसी या पुलाचं काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मुंबईत आले असताना उद्घाटन होणार होते. मात्र, पुलाच्या काही भागात डांबरीकरण रखडल्यानं उद्घाटन होऊ शकल नाही. सप्टेंबर महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने डांबरीकरण करता आलं नाही. पुढील आठवड्यात पुलाच्या दुरुस्तीचा आराखडा एमएसआरडीसी वाहतूक विभागाला देणार आहे. पूल बंद केल्यानंतर वाहतूक अन्यत्र कशी वळवता येईल, याविषयी वाहतूक पोलिस पर्यायी मार्ग सुचवणार आहेत.
हेही वाचा -
राज ठाकरे म्हणजे मनोरंजन…मनोरंजन…मनोरंजन- अमृता फडणवीस
जनशताब्दी एक्सप्रेसला पुन्हा जोडणार पारदर्शक डबा