Advertisement

मुंबईत गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर


मुंबईत गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर
SHARES

मुंबईतल्या अनेक परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. काही ठिकाणी दिवसातून केवळ एकादाच पाणी येणं, तर काही ठिकाणी पाणी येऊन न आल्यासारखं वाटणं अशा अनेक त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत मुंबइकरांना पिण्याच्या पाण्याची चिंता असताना एकीकडं हेच पाणी गाड्या धुण्यासाठी वापरलं जातं आहे.

याबाबत नगरसेवकांनी महापालिकेकडं कारवाईची मागणी केल्यानंतर महापालिकेनं दंडात्मक कारवाई करण्यासाठी १० कर्मचाऱ्यांचं भरारी पथक नेमण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेतला होता. या निर्णयाला आता ५ वर्ष झाली असून अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसंच, हे पथक अजूनही कागदावरच आहे. त्यामुळं पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करण्यास महापालिकेला अपयश आलं हे स्पष्ट झालं आहे. 

पाण्याचा गैरवापर

पिण्याच्या पाण्याचा वापर रस्त्यावर गाड्या धुण्यासाठी, वाहन दुरुस्ती, बागकामासाठी आणि शौचालयासाठी केला जातो. यामुळं पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळं राज्य सरकार व महापालिकेच्या पाणी वाचवा संकल्पनेला सुरुंग लागला आहे. पाण्याचा वापर गाड्या धुण्यासाठी केल्यानं पाण्याची नासाडी होत असून, हे पाणी साचून त्या परिसरात घाण निर्माण होते व डासांचा प्रादूर्भाव वाढून रोगराई पसरत आहे.

लेखी उत्तर

या सूचनेवर तब्बल ५ वर्षांनंतर प्रशासनानं लेखी उत्तर दिलं आहे. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी विशेष कक्ष स्थापन करण्याचा व १० पदं निर्माण करण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेतला होता. ही १० पदं निर्माण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

मुंबईत एकाच रात्री ३ ठिकाणी आग

महाराष्ट्रात १ कोटी तरुण मतदार



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा