Advertisement

महाराष्ट्रात १ कोटी तरुण मतदार


महाराष्ट्रात १ कोटी तरुण मतदार
SHARES

विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यभरातील तरुण मतदारांची संख्या कोटींवर पोहोचली आहे. महाराष्ट्रात १८ ते २५ वयोगटातील १ कोटी ६ लाख ७६ हजार १३ तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये ६० लाख ९३ हजार ५१८ युवक तर ४५ लाख ८१ हजार ८८४ युवती आहेत.

मतदारांची नोंद

६११ तृतीयपंथी मतदारांची नोंदणीही करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून बुधवारी देण्यात आली आहे. राज्यात ४ ऑक्टोबर २०१९पर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये ८ कोटी ९९ लाख ३६ हजार २६१ मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत एकूण ५ हजार ५६० अनिवासी भारतीयांची नोंद झाली आहे. यामध्ये अनिवासी भारतीय पुरुष ४ हजार ५४ आहेत तर १ हजार ५०६ अनिवासी भारतीय महिलांची नोंद झाल्याची माहिती मिळते. 


कोणत्या पक्षाला जास्त मत?

राज्यात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसंच, २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळं या तरूण पिढीचं मत यंदा कोणत्या पक्षाला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 



हेही वाचा -

राष्ट्रवादी नाही, तर शिंदे स्वत:च थकलेत- अजित पवार

फुकट काॅलचा खेळ खल्लास! जिओही आकारणार आता शुल्क



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा