Advertisement

राष्ट्रवादी नाही, तर शिंदे स्वत:च थकलेत- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अजित पवार यांनी देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

राष्ट्रवादी नाही, तर शिंदे स्वत:च थकलेत- अजित पवार
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अजित पवार यांनी देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. राष्ट्रवादी नाही, तर सुशीलकुमार शिंदे स्वत: थकले आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. 

काय म्हणाले होते शिंदे?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एक होणार आहेत, आम्ही एकाच आईची लेकरे आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर दोन्ही पक्ष वाढलेले आहेत, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. 

शरद पवार यांचं उत्तर

त्याला उत्तर देताना, शरद पवार यांनी 'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे मला माझ्या पक्षाची स्थिती चांगलीच ठाऊक आहे. सुशीलकुमार शिंदे त्यांच्या पक्षाबाबत बोलले असावेत, अशा शिंदे यांना उत्तर दिलं. 

तर, सुशीलकुमार शिंदे हे स्वतः थकले आहेत त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस थकले आहेत, असं वक्तव्य केलं. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीही थकणार नाहीत. उलट आघाडीच्या नेत्यांना प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं अजित पवार म्हणाले.हेही वाचा-

विलिनीकरण? शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदेना दिलं सणसणीत उत्तर

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आताच भाष्य कशाला, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रियासंबंधित विषय
Advertisement