Advertisement

विलिनीकरण? शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदेना दिलं सणसणीत उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीकुमार शिंदे यांना सणसणीत उत्तर दिलं.

विलिनीकरण? शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदेना दिलं सणसणीत उत्तर
SHARES

'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे मला माझ्या पक्षाची स्थिती चांगलीच ठाऊक आहे. सुशीलकुमार शिंदे त्यांच्या पक्षाबाबत बोलले असावेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीकुमार शिंदे यांना सणसणीत उत्तर दिलं.  

काय म्हणाले होते शिंदे?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एक होणार आहेत, आम्ही एकाच आईची लेकरे आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर दोन्ही पक्ष वाढलेले आहेत, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. 

‘असं’ दिलं उत्तर

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकाबाजूला आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना शरद पवार मरगळ आलेल्या पक्षाला उभारी देण्यासाठी राज्यभर दौरे करत फिरत आहेत. त्यांच्या भाषणांना तरूणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच खटकलं. त्यांना प्रतिउत्तर देताना राष्ट्रवादीबद्दल सुशीलकुमार शिंदे सांगू शकत नाहीत, ते काँग्रेस पक्षाबाबत सांगू शकतात, असं पवार म्हणाले. 

फडणवीस यांचा टोला

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलिनीकरण झाल्यास किमान विरोध तरी करू शकतील, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.



हेही वाचा-

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आताच भाष्य कशाला? बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

भाजपवाल्यांना दारातसुद्धा उभं करू नका, शरद पवार यांचं आवाहन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा