Advertisement

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आताच भाष्य कशाला, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले असून भविष्यात आम्ही एक होणार,” असं वक्तव्य नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी केलं होतं.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आताच भाष्य कशाला, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
SHARES

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले असून भविष्यात आम्ही एक होणार,” असं वक्तव्य नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काळाच्या ओघात काय होईल, हे आताच सांगता येणार नाही, असं म्हणत चर्चेला पूर्णविराम दिला.  

काय म्हणाले होते शिंदे?

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी भविष्यात एक होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील” 

सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातले मोठे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांनी केलेलं हे सूचक  वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होणार का? याची चर्चा सुरु झाली.  

त्यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की,

आमचे विचार एकच आहेत. सध्या तरी दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचा विषय कोठेच आलेला नाही. मात्र, काळाच्या ओघात काय होईल सांगता येत नाही. त्यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही.'  

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सध्याच्या हिटलरशाही विरोधात दोन्ही पक्षांनी हातात हात घालून वाटचाल करण्याची गरज आहे असं म्हटलं. तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलेलं मत हे त्यांचं व्यक्तीगत मत असून सध्याच्या वातावरणात आघाडीतील दोन्ही पक्षांनी एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे, असं म्हटलं. 



हेही वाचा-

माॅब लिंचिंग हा संघविचाराचाच भाग, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची 'आरएसएस' प्रमुखांवर टीका

Shiv Smarak Scam: भाजपच्या भ्रष्टाचाराचा ‘असा’ केला भांडाफोड- सचिन सावंत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा