Advertisement

माॅब लिंचिंग हा संघविचाराचाच भाग, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची 'आरएसएस' प्रमुखांवर टीका

देशात माॅब लिंचिंगच्या ज्या घटना घडत आहेत, त्या संघविचारातून घडत असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघा (RSS)चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली.

माॅब लिंचिंग हा संघविचाराचाच भाग, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची 'आरएसएस' प्रमुखांवर टीका
SHARES

देशात माॅब लिंचिंगच्या ज्या घटना घडत आहेत, त्या संघविचारातून घडत असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघा (RSS)चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली.

बदनाम करण्याचं षडयंत्र

नागपुरातील रेशीमबाग इथं आयोजित संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलताना भागवत म्हणाले की, मॉब लिंचिंग सारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. माॅब लिंचिंग हा शब्द भारतातला नसून, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही, असा दावा त्यांनी केला. 

एकमेकांमध्ये भेद

तर, विशिष्ट समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त करण्यात येत असताना एकमेकांमधील संघर्ष वाढवण्यात येत आहे. अल्पसंख्यकांमध्ये भय निर्माण करण्यात येत असून एकमेकांमध्ये भेद निर्माण करून दुही निर्माण करण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामागे काही विशिष्ट हेतून काम करणारे लोक आहेत. एखाद्या समुदायातील १०-५ लोकांनी कुणावर अत्याचार केले म्हणून त्या अत्याचारासाठी संपूर्ण समुदायाला जबाबदार धरणे चुकीचं आहे. कायदा आपलं काम करेल, ज्यांना शिक्षा करायची आहे, त्यांना ती केली जाईल असंही भागवत म्हणाले.

खाेटं बोलण्याचा प्रकार

त्यावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, माॅब लिंचिंग हे संघविचारातून आलेलं असं म्हणणं म्हणजे धादांत खोटं बोलण्याचा प्रकार आहे. कारण संघपरिवाराला सातत्याने खोटं बोलण्याची जी सवय आहे, त्यातूनच हे आलेलं आहे. खोटं बोलणं हा संघकार्यपद्धीतीचा भाग आहे.

हेही वाचा-

ईडीची शाखा भाजप कार्यालयात सुरू करा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची भाजपवर टीका

Shiv Smarak Scam: भाजपच्या भ्रष्टाचाराचा ‘असा’ केला भांडाफोड- सचिन सावंत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा