अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मुंबईत वाहन खरेदी मंदावली

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कोणतीही वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. यंदा मात्र वाढत्या इंधन वाढीमुळे तसंच वाहनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे मुंबईत वाहन खरेदी मंदावल्याचं दिसून आलं. मंगळवारी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मुंबईतील ताडदेव, वडाळा आणि अंधेरी आरटीओत केवळ ७८४ नव्या गाड्यांची नोंद झाली.

  • अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मुंबईत वाहन खरेदी मंदावली
SHARE

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कोणतीही वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. यंदा मात्र वाढत्या इंधन वाढीमुळे तसंच वाहनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे मुंबईत वाहन खरेदी मंदावल्याचं दिसून आलं. मंगळवारी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मुंबईतील ताडदेव, वडाळा आणि अंधेरी आरटीओत केवळ ७८४ नव्या गाड्यांची नोंद झाली. 

इंधन दरवाढीचा फटका

दरवर्षी अक्षय तृतीया, दसरा, दिवाळीचा पाडवा आणि गुढीपाडवा या दिवशी वाहन खरेदीसाठी खरेदीदारांच्या रांगा लागलेल्या असतात. गुढी पाडव्याच्या दिवशी गाडी घरी आणण्याचा मुहूर्त साधण्यासाठी जवळपास एक आठवडा आधीपासून वाहन खरेदीची प्रक्रिया सुरू होते. मात्र मंगळवारी वाहन खरेदी करण्यात मुंबईकरांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. इंधन दरवाढ आणि पार्किंगच्या वाढत्या समस्येमुळे मुंबईकरांनी वाहनखरेदीकडे कानाडोळा केल्याचं मत शोरूम मालकांनी व्यक्त केलं.

कोट्यावधीचा महसूल  

मुंबईत प्रामुख्याने ताडदेव, वडाळा आणि अंधेरी या ३ आरटीओत नवीन वाहनांची नोंदणी केली जाते. या तिन्ही आरटीओत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर फक्त ७८४ वाहनांची नोंद झाली. त्यात ताडदेव आरटीओत २९१, वडाळा आरटीओत २७८ आणि अंधेरी आरटीओत २१५ वाहनांची नोंद करण्यात आली. या तिन्ही आरटीओत झालेल्या वाहन नोंदणीद्वारे सरकारी तिजोरीत २ कोटी ४ लाख ५५ हजारांचा महसूल जमा झाला आहे. खरेदी करण्यात आलेल्या वाहनांमध्ये दुचाकीचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं आरटीओ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.हेही वाचा-

रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून १८ जणांची ७० लाखांना फसवणूक

कॅनडाची कंपनी करणार मिठी नदी, पवई तलावाची स्वच्छता

संबंधित विषय
ताज्या बातम्या