• अंधेरीतले जांबाज वाहक-चालक
SHARE

अंधेरी - तुम्ही बसला आहात ती बस कधीही पेटू शकते असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर? पोटात गोळा आला ना? अगदी अशीच काहीशी अवस्था रविवारी अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरच्या बेस्टच्या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची झाली. मुलुंड आगाराच्या या बसला अचानक आग लागली आणि आतल्या प्रवाशांची पाचावर धारण बसली. मात्र प्रसंगावधान दाखवलं ते चालक सूर्यकांत सूर्यवंशी आणि वाहक गणपत कचरे यांनी. मुंबईतलं ट्रॅफिक सर्वश्रुत आहेच. रस्ते लहान आणि वाहनं फार.त्यामुळे एवढ्या गर्दीतून बस चालवणं तसं कठीण कर्मच. त्यातच इतक्या प्रवाशांची जबाबदारी असल्यामुळे हे काम तसं जोखमीचंच. बसचालकांच्या मुजोरीविषयी आपण नेहमीच ऐकतो. मात्र, या घटनेमध्ये जबाबदार बेस्ट कर्मचाऱ्याचा आदर्श नमुनाच या दोघांनी पेश केलाय. कठीण परिस्थितीतही प्रसंगावधान राखून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या या जांबाज वाहक-चालकांना मुंबई लाइव्हचा सलाम.

संबंधित विषय
ताज्या बातम्या